Ladakh Video : उत्तर भारतात ढगफुटी, लडाखमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, लवकरच रस्ते खुले होणार

Video
Video Sakal
Updated on

Ladakh Rain News : उत्तर भारतात मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये पुराच्या पाण्याने थैमान घातलं आहे. दिल्लीच्या यमुना नदीला मोठा पूर आला आहे. तर उत्तराखंडमधील व्यास नदीला आलेल्या पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. कित्येक घरे, रस्ते, पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

Video
Vidarbha Rain Video : विदर्भातील अनेक जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; घरे पाण्याखाली, पिकांचे नुकसान

लेह येथे मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. मोठ्या डोंगाराच एक भाग कोसळल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक अनेक दिवसांपासून बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता सुरक्षा विभागाकडून या रस्त्यावरील मातीचा ढिगारा हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. दोन जेसीबीच्या माध्यमातून रस्त्यावरील माती बाजूला केली जात असून हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. हा व्हिडिओ समोर आला आहे.

दरम्यान, उत्तर भारतात पावसामुळे अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. पर्यटकांच्या गाड्या पुराच्या पाण्यात वाहून जाण्याचे आणि यमुनेच्या पुरामध्ये जनावरे वाहून जातानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर उत्तराखंड राज्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()