Online Fraud करणाऱ्याला महिलेने शिकवला चांगलाच धडा; Whatsapp Chatting वाचून पोट धरून हसाल

Online Fraud
Online FraudSakal
Updated on

अलीकडच्या काळात ऑनलाईन फसवणूक होण्याचे प्रमाण चांगलेच वाढलेले आहे. काहीतरी आमिष दाखवून ऑनलाईन पद्धतीने आपली फसवणूक केली जाते. तर अनकेदा ऑनलाईन खरेदी करतानासुद्धा आपली फसवणूक होऊ शकते. ट्वीटरवर सध्या अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे.

Online Fraud
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये एका महिलेला व्हाट्सअपवर मेसेज येतो आणि युट्यूबवरील एका व्हिडिओला लाईक आणि सब्स्क्राईब केल्यावर तुम्हाला १५० रूपये मिळणार असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने महिलेला टास्क दिला आणि व्हिडिओला लाईक केल्याचा स्क्रीनशॉट पाठवायला सांगितला.

त्यानंतर या महिलेने "काही मुर्ख लोकांना फसवणूक करताना पकडले" असं हेडिंग असलेल्या व्हिडिओला लाईक केल्याचा स्क्रीनशॉट समोरच्या व्यक्तीला पाठवला.

दरम्यान, हा फोटो फसवणूक करणाऱ्याला मिळाल्यानंतर त्याने एकही मेसेज पाठवला नाही. त्याला कळाले की, समोरचा व्यक्ती आपल्याकडून फसणार नाही. त्यामुळे त्याने चॅटिंगमधून काढता पाय घेतला. तर आपल्यालाही असा अनोळखी मेसेज आल्यावर आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता समोरच्या व्यक्तीला ब्लॉक करायला हवं.

सदर फोटो हे उदिता पाल या अधिकृत ट्वीटरवरून शेअर करण्यात आले असून त्या neo banking solution च्या co-founder आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.