OYO CEO : 'सफाई कामगार ते CEO' एकदा चक्क मालकालाच ओयोमध्ये मिळाली होती 20 रुपये टिप...स्वतः सांगितला किस्सा

ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी त्यांच्या हॉस्पिटॅलिटी कंपनीमध्ये कधी फ्रंट डेस्क मॅनेजर तर गरज पडेल तेव्हा क्लिनिंग स्टाफ म्हणून सुद्धा काम केले.
OYO CEO
OYO CEO esakal
Updated on

OYO CEO : ओयोचे सीईओ रितेश अग्रवाल यांनी त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण एका मुलाखतीत काढली. मुलाखतीत बोलता बोलता सुरुवातीच्या दिवसांत त्यांना कोणत्या गोष्टी सहन कराव्या लागल्या याबाबतचा खुलासा त्यांनी केला. त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाय व्हायरल होतोय. सुरुवातीच्या दिवसांत ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांनी त्यांच्या हॉस्पिटॅलिटी कंपनीमध्ये कधी फ्रंट डेस्क मॅनेजर तर गरज पडेल तेव्हा क्लिनिंग स्टाफ म्हणून सुद्धा काम केले.

१९ वर्षांच्या तरुण वयात, रितेश अग्रवालने महाविद्यालय सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला, जो त्यांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देणारा ठरला. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ते अब्जाधीश पीटर थील यांनी स्थापन केलेल्या प्रतिष्ठित थील फेलोशिपसाठी पात्र ठरले. उल्लेखनीय म्हणजे, अग्रवाल हे फेलोशिपचे पहिले आशियाई प्राप्तकर्ते ठरले, ज्याने त्यांना $100,000 चे अनुदान दिले. या आर्थिक पाठिंब्याने सुसज्ज होत ते OYO सुरू करण्याच्या स्वप्न रंगवत भारतात परतले.

OYO च्या सुरुवातीच्या टप्प्यात, अग्रवाल थियेल फेलोशिपमधून परतल्यानंतर, त्यांनी कंपनीमध्ये सफाई कामगार ते फ्रंट मॅनेजर अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या. कधी गरज पडेल तेव्हा सफाई कर्मचार्‍यांचा गणवेश धारण करणे, ग्राहक सेवा हाताळणे किंवा फ्रंट डेस्कचे व्यवस्थापन करणे असो वा इतर कुठली कामं अग्रवाल यांनी व्यवसायात हवे तसे स्वत:ला रुजवून घेतले.

OYO CEO
OYO चा IPO लवकरच बाजारपेठेत? ८ हजार कोटी खुले करणार

Biz Tak ला दिलेल्या मुलाखतीत, रितेश अग्रवालने त्यांच्या आठवणीतला एक किस्सा सांगितला, एका खोलीतील एक ग्राहक खोली साफ करायला १० मिनिटे उशीर झाला म्हणून चांगलाच चिडला होता. साफसफाईला उशीर झाला म्हणून त्याने स्टाफला चांगलेच फटकारले.

OYO CEO
OYO CEO

मात्र अग्रवाल यांचा स्टाफ त्यावेळी पलीकडची खोली साफ करत होता. त्यावेळी अग्रवाल यांनी क्षणाचा विचारही न करता बिनधास्तपणे, खोली काळजीपूर्वक स्वच्छ करण्याची जबाबदारी हाती घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ग्राहक अग्रवाल यांच्या समर्पणाने आणि त्यांच्या कामातील निटनेटकेपणाने एवढा प्रभावित झाला की, त्यांनी त्यांना कौतुकाचे प्रतीक म्हणून 20 रुपये दिले. (OYO)

हा त्यावेळचा किस्सा त्यांना आजही आठवतो, मुलाखतीच्या माध्यामातून अग्रवाल यांनी त्यांच्या प्रवासातील काही महत्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत काम करणारे हाऊसकीपर्स, फ्रंट डेस्क मॅनेजर यांची भूमिका फार महत्वाची असते. हे पंचतारांकित क्षेत्र केवळ आणि केवळ त्यांच्यामुळेच पुढे आहे आणि यात त्यांचे मोलाचे योगदान आहे असे ते म्हणाले. (Ritesh Agrawal)

ह्युमन्स ऑफ बॉम्बे सोबतच्या 2020 च्या मुलाखतीत, अग्रवाल यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल अधिक तपशीलवार माहिती दिली, "त्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, मी हॉटेलच्या कर्मचार्‍यांचा भाग म्हणून काम केले - सर्व्हिसिंग रूम, बेबीसिटिंग आणि अगदी ग्राहकांसोबत UNO खेळणे!" ग्राहक खूश होऊन त्यांना यासाठी टिपसुद्धा द्यायचे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.