Video: पाकिस्तानच्या पंतप्रधानाची रशियासमोर फजिती; हेडफोन लावता येईनात

Viral Video
Viral VideoSakal
Updated on

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची फजिती झाल्याचं दिसत आहे. त्यांची फजिती पाहून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हेसुद्धा हसताना आपल्याला या व्हिडिओत दिसत आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी शरीफ यांना ट्रोल केल्याचं आपल्याला दिसत आहे.

(Pakistan PM Shehbaz Sharif And Russia PM Vladimir Putin Viral Video)

दरम्यान, पाकिस्तान आणि रशियादरम्यान द्वीपक्षीय चर्चा सुरू असताना एका कार्यक्रमात हा प्रकार पहायला मिळाला आहे. एका कार्यक्रमाच्या सुरूवातील कानात हेडफोन लावत असताना शरीफ यांची फजिती झाली आहे. त्यांची फजिती पाहून पुतीन यांनासुद्धा हसू आवरले नाही. दरम्यान त्यानंतर शरीफ यांना नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात येत आहे.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) च्या वेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. रशियन सरकारी वृत्तसंस्था आरआयएने हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेकांनी या व्हिडिओखाली कमेंट करून शरीफ यांच्यावर टीका केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.