Driving licence for physically handicapped: भारतात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतेय. परिणामी आरटीओ RTO कार्यालयाबाहेर ड्रायव्हिंग लायसन्ससाठी म्हणजेच वाहन परवान्यासाठी रांगा वाढू लागल्या आहेत.
परवान्यासाठी अर्ज करणं, त्यानंतर ऑनलाईन परिक्षा Online Exam तसंच आरटीओ निरिक्षकाच्या उपस्थितीत वाहन चालवण्याची चाचणी पार पडल्यानंतर सुरुवातीला लर्निंग लायसन्स दिलं जातं आणि त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स प्राप्त होतं.
आता ही झाली सर्व नागरिकांसाठी असलेली परवाना मिळवण्याची प्रक्रिया. Physically Handicap Special Persons also to get Driving License
मात्र गेल्या काही वर्षांपासून दिव्यांगानाही लायसन्स Driving License देण्याची योजना शासनाने सुरु केली आहे. पूर्वी दिव्यांगांना परवाना मिळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता यासाठी आता शासनाने Maharashtra Government ही प्रक्रिया आता सोपी केली आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या परवान्याला 'अॅडॅपटेड ड्रायव्हिंग लायसन्स' म्हंटलं जातं.
अशी कोणतीही दिव्यांग व्यक्ती जी योग्य प्रकारे वाहन चालवू शकते अशा प्रत्येकाला आता कोणत्याही कायदेशीर अडचणीशिवाय परवाना मिळू शकतो. दिव्यांगांसाठी तयार करण्यात आलेल्या वाहनांना किंवा वाहनात बदल करून ते वापरत असलेल्या वाहनांना डिसेबल कॅरेज म्हंटलं जातं.
तर लवकरच अशा वाहनांना मोटार वाहन कायद्यात "अॅडॉप्टेड व्हेईकल" म्हणून संबोधलं जाणार आहे. तर दिव्यांगाना ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी नेमकं काय करावं लागतं? कोणत्या कागदपत्रांचा पूर्तता करावी लागते हे आपण जाणून घेणार आहोत.
दिव्यांगांना कसा मिळेल वाहन चालक परवाना
सर्व प्रथम तुम्हाला तुमचं वाहन डिसेबलिटी फ्रेण्डली म्हणजे ते चालवण्यासाठी अनुकुल बनवावं लागेल. म्हणजेच तुम्हाला ते योग्य प्रकारे चालवता येईल यासाठी ते मॉडिफाय करावं लागेल. अलिकडे अनेक कंपन्या दिव्यांगांसाठी कार अपग्रेड करत आहेत. त्यामुळे खरेदी करतानाच तुम्ही असं वाहन खरेदी करू शकता.
हे देखिल वाचा-
परवान्यासाठी आवश्यक कागदपत्र
अपंगत्व ओळखपत्र आणि अपंगत्व प्रमाणपत्र, चेसिस क्रमांकाच्या दोन प्रती
सोबत तुम्हाला आरटीओ आफिसरसाठी एक विनंती पत्र जोडावं लागेल ज्यात तुमच्या वाहनाची नोंदणी ही डिसेबल कॅरेज म्हणून करावी आणि तुम्हाला वाहन करात सूट मिळाल्याचं नमूद करावं लागेल.
या सर्व कागदपत्रांसह तुम्हाला तुमचं वाहन आरटीओ कार्यालयात तपासणीसाठी द्यावं लागेल.
तुमच्यासाठी योग्य वाहन निवडल्यानंतर तुम्हाला ओळखपत्र, तुम्ही राहत असलेल्या ठिकाणाचा पुरावा (Address proof) आणि कार इन्शुरन्सची (Car insurance) प्रत लागेल.
तुमचं वाहन डिसेबल कॅरेजमधील श्रेणीत असल्याच्या पुराव्यासह तुम्हाला फॉर्म 20 भरावा लागेल.
काम सुरळीत होण्यासाठी आधी सर्व कागदपत्र तयार असतील तर परवाना मिळण्यासाठी सोप्प होईल. त्यानंतर पुढील टप्प्याने तुम्ही परवाना मिळवू शकता. यासाठी तुम्ही आरटीओ कार्यालयात जाऊनह अर्ज करू शकता किंवा ऑनलाईनही अर्ज करू शकता.
अर्जदाराचे तपशील भरा.
आवश्यक कागदपत्र अपलोड करा किंवा अर्जासोबत जोडा.
तुमचा फोटो अपलोड करा.
डायव्हिंग लायसन्सच्या चाचणीसाठी तारिख आणि वेळ निवडा
परवान्याची फी भरा आणि फी भरल्याची पावती प्रिंट करा. अनेक राज्यांमध्ये दिव्यांगांकडून नोंदणी शुल्क आकारलं जातं नाही.
कागदपत्र कार्यालयात जमा केल्यानंतर तुम्हाला आरसी बुक घेण्यासाठी पुन्हा एका आठवड्याने बोलावण्यात येईल.
दिव्यांगानादेखील वाहन चालवून प्रात्यक्षिक चाचणी आणि प्रश्नोत्तरांची ऑनलाईल किंवा लेखी चाचणी द्यावी लागेल.
यानंतर तुम्हाला परवाना प्राप्त होईल. आपलं वाहन डिसेबल कॅरेजमध्ये बदलण्यासाठी १२० रुपये आकारले जाऊ शकतात.
दिव्यांगाना वाहन परवान्यासाठी आवश्यक असणार महत्वाचं प्रमाणपत्र म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र. या प्रमाणपत्रासाठी तुम्ही UDUD च्या वेबसाईटला भेट देऊ शकता. महत्वाचं म्हणजे दिव्यांगांना परवाना मिळत असला तरी त्यापूर्वी असलेल्या अटी आणि शर्ती तितक्याच महत्वाच्या आहेत.
मानसिकदृष्ट्या स्थिर असलेल्या व्यक्तीलाच हा परवाना मिळू शकतो.
उत्तमरित्या दुचाकी किंवा चारचाकी चालवता येणं गरजेचं.
मेडिकल सर्टिफिकेट हे अत्यंत महत्वाचं आहे.
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर दिव्यांगांना वाहन चालक परवाना मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.