पाकिस्तान इंटरनेशनल एअरलाइन्स (PIA) ने पुन्हा एकदा आपल्या खराब व्यवस्थेमुळे प्रवाशांना अडचणीत टाकले आहे. दुबईहून पेशावरला जाणारे PK-284 हे विमान अनपेक्षितपणे कराचीत उतरले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत दिसते की विमानातील प्रवासी या चुकीच्या लँडिंगमुळे चांगलेच संतप्त झाले होते. विमानातील प्रवाशांनी पायलट आणि विमान कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद घातला आणि या गैरसोयीवरून गोंधळ निर्माण केला.
मिळालेल्या माहितीनुसार, PIAच्या या विमानाला पेशावरमध्ये उतरायचे होते. मात्र पायलटने कराचीत लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. परंतु, या निर्णयाची आधी प्रवाशांना माहिती न दिल्यामुळे आणि त्यांना लाउंजमध्ये नेण्याऐवजी विमानातच काही तास अडकवून ठेवल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढली. काही प्रवाशांनी विमान कर्मचाऱ्यांवर जोरदार टीका करत हा प्रकार उघड केला.
PIAची ही घटना नवीन नाही. गेल्या काही आठवड्यांपासून PIAच्या विमानांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. गेल्या आठवड्यातच PIAच्या एका विमानाने दुबईत आणीबाणीची लँडिंग केलं होतं. यामुळे PIAच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 2020 मध्ये युरोपियन युनियनने PIAच्या विमानांना आपल्याकडे प्रवेशबंदी घातली होती. याचे मुख्य कारण म्हणजे PIAमध्ये काही पायलट्सकडे परवाना नसल्याचे उघड झाले होते. त्यामुळेच PIAला आपल्या विमानसेवांच्या सुरक्षिततेबाबत कठोर नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
या घटनेनंतर अनेक प्रवाशांनी PIAच्या व्यवस्थापनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. काही प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून आपली नाराजी व्यक्त केली. या व्हिडिओमध्ये प्रवासी विमानाच्या आतच पायलट आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसतात. कराचीत विमान कसे उतरवले गेले, याबाबत प्रवाशांना कोणतीही माहिती न दिल्यामुळे त्यांचा संताप अधिकच वाढला. PIAच्या प्रवक्त्याने मात्र सांगितले की, हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेतला होता आणि लवकरच सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पेशावरला पोहोचवण्यात आले.
PIAच्या सततच्या तांत्रिक बिघाडांमुळे आणि सुरक्षिततेच्या समस्यांमुळे आता सरकार त्याच्या खाजगीकरणाच्या विचारात आहे. PIAने गेल्या काही वर्षांत अनेक संकटांचा सामना केला आहे, ज्यात आर्थिक तुटीबरोबरच सुरक्षिततेसाठीचे कठोर नियम पाळण्यास अपयश आले आहे. या विमान कंपनीला सुधारणेची गरज आहे, कारण युरोपियन युनियनने केलेली बंदी आणि सातत्याने येणाऱ्या समस्यांमुळे तिची विश्वासार्हता ढासळली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.