Trending : मूर्ती लहान पण किर्ती महान! PM मोदींनी पाळलेल्या गायीच्या या गोष्टी तुम्हालाही आश्चर्यचकीत करतील!  

PM Modi And Punganur Cow : पंतप्रधानांची गाय दिपज्योती प्रमाणे तुम्हीही घरात पाळू शकता या जातीची गाय
Trending
Trending esakal
Updated on

PM Modi And Punganur Cow :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पशुप्रेम जगजाहीर आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान आवासात अनेक पशु प्राणी पाळले आहेत. आपण मांजर, कुत्रा पाळण्याचा विचार करू शकतो. पंतप्रधान मोदींनी आता चक्क गाय पाळली आहे.

शेतकऱ्यांच्या घरी हमखास गायी-म्हशी असतात. पण शहरातील लोक गाय पाळण्याचा विचार सुद्धा करू शकत नाहीत. कारण, गाय पाळण्यासाठी मोठी जागा असावी लागते. पण पंतप्रधान मोदींनी गाय पाळली आहे. पंतप्रधानांचा गायीसोबतचा एक व्हिडिओ नुकताच वायरल झाला आहे. (PM Modi)

Trending
Cow Milk Rate Hike: गायीचं दूध महागलं! दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ

पंतप्रधान मोदींनी पाळलेली गाय एका वेगळ्या जातीची आहे. तिची उंची फार वाढत नाही. त्यामुळे ती पाळणं सहज शक्य आहे. या गायीची जात कोणती आणि ती पाळण्यासाठी काय करावे लागेल याबद्दल अधिक माहिती घेऊया.  

पंतप्रधान मोदींनी X वर एका पोस्टमध्ये माहिती दिली की, त्यांच्या पंतप्रधान निवासस्थानी गायीचे वासरू आले आहे. त्यांनी या वासराचे नाव ‘दीपज्योती’ ठेवले आहे. (Pangnur cow)

Trending
Diamonds From Cow : आता गायीचा ढेकर आणि गॅसपासून बनवणार हिरे,  iPod निर्माता टोनी फैडेल यांचा दावा!

पंतप्रधानांच्या निवासस्थानी प्रिय माता गायीने नवीन वासराला जन्म दिला असून तिच्या कपाळावर दिव्याच्या ज्योतीची खूण आहे. म्हणून मी त्याचे नाव ‘दीपज्योती’ ठेवले आहे,असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तुम्हीही घरात पाळू शकता ही गाय

पुंगनूर जातीच्या या गायी अतिशय सुंदर असतात.  पाहताच क्षणी मन मोहून जाते. या जगातील सर्वात लहान गायी आहेत. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आढळणारी ही देशी गाय आहे.

पुंगनूर जातीच्या या गायी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र आता ही जात वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या जातीच्या गायींनी पहिल्यांदाच संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते जेव्हा पंतप्रधान मोदींनी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर त्यांची ओळख करून दिली होती.

Trending
Cow Dung Wood For Holi 2023 : ज्जे बात...! खास होळीसाठी महिलांनी गायीच्या शेणापासून बनवलं ६ टन लाकूड

किती असते या गायींची उंची अन् वजन

पुंगनूर ही गायीची दुर्मिळ प्रजाती आहे, या गायीचे नाव आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर या गावावरून ठेवण्यात आले आहे. पुंगनूर गाय पांढरी आणि तपकिरी रंगाची असते. ज्याचे कपाळ खूप रुंद आणि शिंगे लहान असतात. पुंगनूर गायीची सरासरी उंची अडीच ते तीन फूट असते. त्याच वेळी, या गायीचे जास्तीत जास्त वजन 105 ते 200 किलो पर्यंत असते.

गायीचे दूध असते पोषक

या गायीच्या दुधातही अनेक औषधी गुणधर्म आहेत. या गायींचा उल्लेख पुराणातही आढळतो. पुंगनूर गाईच्या दुधाची खास गोष्ट म्हणजे त्यामध्ये 8 टक्के फॅट आढळते. तर इतर गाईच्या दुधात फक्त 3 ते 5 टक्के फॅट असते. याशिवाय पुंगनूर गाईच्या मूत्रात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. आंध्र प्रदेशातील शेतकरी पिकांवर फवारणीसाठी त्याचा वापर करतात.

Trending
Cow Dung Wood For Holi 2023 : ज्जे बात...! खास होळीसाठी महिलांनी गायीच्या शेणापासून बनवलं ६ टन लाकूड

किती असते गायीची किंमत

तुम्हाला पंगनूर गाय 1 लाख ते 25 लाख रुपयांपर्यंत मिळू शकते. पुंगनूर गायीचे वय जितके लहान असेल तितकी तिची किंमत जास्त असेल, असेही मानले जाते. त्यांची संख्या कमी असल्याने त्याची किंमत जास्त आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.