सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. पण अमेरिका दौऱ्या दरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे ते चर्चेत आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी आदल्या दिवशी या कार्यक्रमाला सहमती दर्शवल्याचं वृत्त एपी एजन्सीने दिलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ९ वर्षाच्या पंतप्रधानपदाच्या काळात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. एकदा यासाठी प्रयत्न झाला होता पण त्यावेळी ते पत्रकारांशी बोलले नव्हते. त्यामुळे पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख होती. पण काल त्यांनी अमेरिकेत पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेसाठीही मोदींकडून फक्त एक दिवस आधी परवानगी देण्यात आल्याची माहिती आहे. पत्रकार परिषदेत बोलतानाही मोदींच्या समोर टेलिप्रॉम्प्टर लावले होते. त्यामुळे विरोधकांनीही मोदींवर टीका केली आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले मोदी?
भारतीतील धार्मिक असहिष्णुता, जातीय भेदभाव आणि भाषण स्वातंत्र्यावर दबाव आणण्याच्या पत्रकाराच्या प्रश्नावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, "अमेरिकन लोकांकडून प्रश्न विचारण्यात आलेली लोकशाही मूल्यांप्रती भारताची वचनबद्धता ऐकून मला 'खरोखर आश्चर्य' वाटले. लोकशाही आमच्या डीएनएमध्ये आहे, आम्ही लोकशाही जगतो आणि ती आमच्या संविधानाच्या रूपात आहे. आम्ही जात, वंश, धर्म, लिंगभेद करत नाही. त्यामुळे भेदभावाचा मुद्दाच राहत नाही." असं बोलून पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेत भारतीय लोकशाहीचा बचाव केला.
स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, सहिष्णुता, विविधता यावर प्रश्न विचारले असता, अध्यक्ष बायडेन म्हणाले की, "लोकशाही मूल्यांबद्दल माझी आणि मोदींची चांगली चर्चा झाली आहे. दोन्ही देश स्वातंत्र्य जपतात आणि सार्वत्रिक मानवी हक्कांची लोकशाही मूल्ये साजरी करतात. हे मूल्ये प्रत्येक राष्ट्राच्या यशासाठी महत्त्वपूर्ण आहेत." असं बायडेन म्हणाले.
त्याचबरोबर बायडेन प्रशासनाने भारताच्या लोकशाही मागासलेपणाबद्दल आणि मानवी हक्कांच्या परिस्थितीवर शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी ब्लूमबर्गला दिली आहे.
मोदी पुढे म्हणाले की, भारत आणि अमेरिका हे जगातील सर्वांत मोठी लोकशाही राष्ट्र आहेत. हे दोन देश जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी योगदान देऊ शकतात. तसेच हे देश दहशतवाद आणि कट्टरतावादाच्या विरुद्धच्या लढाईत खांद्याला खांदा लावून चालत आहेत. सीमेवरील दहशतवाद संपवण्यासाठी ठोस कारवाई करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांनी सहमती दर्शवल्याचं पंतप्रधान मोदी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
इंडो-पॅसिफिक प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि या प्रदेशाचा विकास ही आमची सामायिक जबाबदारी असून यावर आमचे एकमत आहे असेही ते पुढे म्हणाले. यावेळी बायडेन यांनी त्यांच्या प्रशासनातील भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांच्या योगदानाचा उल्लेख केला. ज्यामध्ये कमला हॅरिस यांचासुद्धा सामावेश असल्याचं सांगत दोन्ही राष्ट्रामधील संबंध त्यांनी अधोरेखित केले.
त्याचबरोबर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना हुकूमशहा म्हणण्याच्या टिप्पणीवरून बायडेन यांनी बचावर करत चीन अमेरिका संबंधावर नाकारात्मक परिणाम होणार नाही याची काळजी घेतली. त्याचबरोबर भविष्यात त्यांना भेटण्याची इच्छाही बोलवून दाखवली.
युक्रेनच्या शांततेसाठी सर्व प्रयत्नांना मदत करण्यासाठी भारत तयार असल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलं. युक्रेन वादाच्या सुरूवातीपासूनच भारताने संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून समस्येचे निराकरण करण्यावर भर दिला आहे. या भागातील शांततेसाठी मदत करण्यास भारत तयार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.