Melodi Video: फ्रेंडशिप अमर रहे... मोदींनी शेअर केला PM मेलोनी यांच्या सोबतचा व्हायरल व्हिडीओ

PM Modi And Meloni Video: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रील व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओ शेअर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत-इटली मैत्री चिरंजीव राहो.
PM Modi And Meloni Video
PM Modi And Meloni VideoSakal
Updated on

PM Modi And Meloni Video: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओ शेअर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत-इटली मैत्री चिरंजीव राहो. G7 मध्ये भाग घेऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी परतले आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते.

G7 परिषदेत पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. यादरम्यान पीएम मोदी आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील मैत्री पाहायला मिळाली. मेलोनी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

PM Modi And Meloni Video
Gold Reserve: रिझर्व्ह बँक शेकडो टन सोने कुठे ठेवते? यासाठी वेगळे लॉकर आहे का?

प्रथमच इटलीच्या पंतप्रधानांनी G7 ला भेट देणाऱ्या नेत्यासोबतचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी फक्त नेत्यांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये दोन्ही देशांचे पंतप्रधान हसताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये मेलोनी म्हणतात की, 'मेलडी टीमकडून सर्वांना नमस्कार...' व्हिडिओमध्ये पीएम मोदी हसताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींचे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी स्वागत केले. G7 समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी गुरुवारी (13 जून) इटलीतील अपुलिया येथे पोहोचले.

PM Modi And Meloni Video
G7 Summit: पंतप्रधान मोदींनी कोणत्या देशांशी केली चर्चा? G7चा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा काय?

G-7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. याशिवाय इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्य क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत आयोजित केलेल्या सत्रात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.