Viral News : रस्ता खराब; चुक कबूल करत मंत्र्यांने धुतले चिखलाने भरलेले पाय अन्…

pradhuman Singh washed  feet of person apologised for bad condition of road in Gwalior  video goes viral
pradhuman Singh washed feet of person apologised for bad condition of road in Gwalior video goes viral
Updated on

रस्ते खराब असण हे कुणासाठी नवीन नाही, पण रस्ते खराब आहेत म्हणून मंत्र्यांने माफी मागणं हे कधी घडल्याचं आपण पाहत नाही.

सध्या हे अशाच एका व्हिडीओमुळे मध्यप्रदेशचे उर्जामंत्री पदुमन सिंह तोमर हे चर्चेत आले आहेत. त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये हे मंत्री हे एका तरुणाचे चिखलाने भरलेले पाय धुताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेमकं प्रकरण काय आहे?

मध्यप्रदेश सरकारमध्ये उर्जामंत्री असलेले तोमर हे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात रस्त्याची पहाणी करण्यासाठी पोहचतात. यावेळी जेव्हा ते ग्वालियर मधील मेंटल हॉस्पिटलजवळच्या रस्त्याची पाहाण्याकरण्यासाठी पोहचले तेव्हा नागरीकांनी रस्त्यांच्या स्थितीबद्दल त्यांत्याकडे तक्रार केली. रस्त्यांवर कायम चिखलमय असल्याची तक्रार मंत्र्यांकडं केली.

pradhuman Singh washed  feet of person apologised for bad condition of road in Gwalior  video goes viral
G20 in Pune Viral Memes : तर मग झेड ब्रीजचं सुशोभिकरण का नाही? जी-२० वरुन पुणेकरांचे टोमणे

यावेळी जवळून एक तरूण जात होता. त्या तरुणाचे पाय चिखलाने भरलेले होते. त्याला पाहून मंत्र्यांनी हात जोडून त्याची माफी मागीतली आणि मी तुमच्यामुळेच आहे असेही सांगितले. इतकेच नाही तर त्यांनी पाणी मागवले आणि स्वतः च्या हाताने त्या तरुणाचे चिखलाने माखलेले पाय धुतले. यानंतर त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून खडे बोल सुनीवले.

pradhuman Singh washed  feet of person apologised for bad condition of road in Gwalior  video goes viral
Maharashtra Politics : निलेश राणे Vs संजय राऊत; आजी-माजी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ!

तोमर यांचे म्हणणे आहे की, मी जो कोणी आहे ते जनतेमुळे आहे त्यामुळे लोकांना होणार त्रास ही माझी समस्या आहे. मी त्यांच्या अडचणी पूर्णतः संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे.लोकांना असलेल्या वीज, पणी आणि रस्ते यासारख्या समस्यांवर लक्ष ठेवले जात आहे. हेच कारण देत सध्या प्रदुमन सिंह तोमर हे वेगवेगळ्या ठिकाणी जात पाहाणी करत आहेत.

pradhuman Singh washed  feet of person apologised for bad condition of road in Gwalior  video goes viral
Sharad Pawar : "भावी पंतप्रधान म्हणून मिरवलं अन्… "; भाजपकडून पवारांची चंद्रकांत पाटलांशी तुलना

यापूर्वी सोडली होती चप्पल

उर्जा मंत्री तोमर यांनी शहरातील खराब रस्ते पाहूण स्वतः चप्पल घालणे बंद केले होते. तसेच संकल्प केला होता की, जोपर्यंत रस्ते बनवले जात नाहीत तोपर्यंत चप्पल घालणार नाहीत. त्यानंतर अधिकारी सक्रिय झाले आणि त्या रस्त्यांचे काल तात्काळ सुरू झाले. काम शेवटच्या टप्प्यावर पोहतले असताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी नवीन चप्पल मागवून तोमर यांना घातली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.