Pune News : पुण्यातील एका चाइल्ड केअर रूग्णालयात अशा मुलीचा जन्म झाला जिचे वजन फक्त 400 ग्राम आहे. शिवाय या बाळाचा जन्म प्रसुतीकाळाच्या फार आधी म्हणजे अगदी सहा महिन्यात झालाय. या मुलीचे वजन दूधाच्या अर्धा लिटर पिशवीएवढेही नाही. तिचे वजन लक्षात घेता तिचे नाव रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. प्रीमॅच्युअर डिलीव्हरीच्या प्रकरणांमध्ये तिचे वजन सगळ्यात कमी असून भारतातील हे पहिलंच प्रकरण आहे.
जन्मलेल्या मुलीचे नाव शिवन्या असे आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार तिचा जन्म वेळेआधीच झाला असून याला प्री-मॅच्युअर डिलीवरी असं म्हटलं जातं. तसेच प्रीम्यॅच्युअर बाळांमध्ये शिवन्या ही भारतातील सगळ्यात लहान मुलगी ठरली आहे. आश्चर्य म्हणजे ही मुलगी एवढ्या कमी वजनाची असूनही तिचे प्रकृती बरी असून तिला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आलीय. तिचे आईवडील हे वाकड परिसरातील निवासी आहे. (New Born Baby)
शिवन्याचा जन्म 21 मे 2022 मध्ये झालाय. प्रीमॅच्युअर डिलीवरीमध्ये तिचा जन्म झाल्याने तिला 94 दिवसांसाठी डॉक्टरांच्या निगराणीमध्ये ठेवण्यात आलं होतं. सुट्टी मिळाल्यावर तिचं वजन 2,130 ग्राम एवढं झालं. डॉक्टरांनी सांगितले की या मुलीच्या जगण्याची शक्यता केवळ 0.5 टक्के होती. (Baby Care)
पुणेच्या सूर्या मदर चाइल्ड केअरमध्ये या बाळाचा जन्म झाला. नोनटोलॉजिस्ट डॉक्टर सचिन शाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की प्री-मॅच्युअर डिलीव्हरीमध्ये भारतातील ही सगळ्यात कमी वजनाची लहान मुलगी होती. भारतातलं हे पहिलंच प्रकरण होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.