Pune Viral Video : पुणे तिथे काय उणे! चक्क श्वानाला घातलं हेल्मेट आणि निघाली सवारी

सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
pune viral video
pune viral videosakal
Updated on

Pune Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही मजेशीर असतात तर काही थक्क करणारा असतात पण सध्या एक पुण्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि पुणे तिथे काय उणे, असं म्हणाल.

हेल्मेट जनजागृतीसाठी पोलिसांनी एक अनोखी शक्कल लढवली आणि चक्क पाळीव श्वानाला हेल्मट घालून जनजागृती केली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. (Pune Viral Video Traffic police a Sweet and Safe Approach by wearing helmet to Dog )

हेल्मेट हे गाडी चालवताना किती उपयोगाचे असते, हे प्रत्येकालाच माहिती आहे. त्यामुळे वाहतूक विभाग नेहमी हेल्मेट वापरण्याचा सल्ला देतात आणि त्यासंदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न करतात तरी सुद्धा काही लोक हेल्मेट घालत नाही.

पुण्यात अशाच लोकांसाठी वाहतूक पोलिसांनी अनोकी शक्कल लढवली आणि श्वानाला हेल्मेट घालून जनजागृती केली. पुणे वाहतूक विभागाचे पोलिस नाईक आतिश खराडे यांनी नागरिकांना हेल्मेट घालण्याच आवाहन करण्यासाठी थेट त्यांच्या पाळीव श्वानाला हेल्मेट घालून जनजागृती सुरू केली आहे.

याचा व्हिडीओ व्हायरल झालाय आणि या व्हिडीओवर लोक कौतुकाचा वर्षाव करताहेत. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की पोलिसांनी श्वानाला आपल्या गाडीवर समोर बसवून हेल्मेट परिधान करुन दिले आणि जनजागृती केली. सध्या पोलिसांच्या या स्तुत उपक्रमाचे सर्व स्तरावरुन कौतुक केले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.