Causes of Inflation: गेल्या वर्षभरापासून महागाईत तेजीने वाढ होते आहे. यामुळे सामान्यांना कोणतीही वस्तू खरेदी करणं अत्यंत कठिण झालं आहे. ताजी सरकारी आकडेवारी पाहता फेब्रुवारीमध्ये महागाईचा दर हा ६.४४ टक्के इतका होता.
नोव्हेंबर आणि डिसेंबर वगळता महागाईचा दर हा RBI ने निर्धारित केलेल्या २ ते ६ टक्क्यांच्या वर राहिली आहे. Reasons Behing Inflation in the World including India
महागाईचा फटका केवळ भारतीयांनाच नव्हे तर संपूर्ण जगभरातील जनतेला सोसावा लागतोय. जगभरातील उलाढालींमुळे काही प्रमुख आणि बड्या देशांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागतोय.
अशात वर्ल्ड बँकने World Bank मात्र भारतीयांना काहीसा दिलासा दिला आहे. भारतात महागाईचा Inflation दर हा ६.६ टक्क्यांवरून घसरून ५.२ टक्क्यांवर येण्याची शक्यता असल्याचं वर्ल्ड बँकेचं निरिक्षण आहे.
दरम्यान भारतात मार्चमध्ये काही रिटेलसह Retail काही क्षेत्रांमध्ये हा दर खाली आला असला तरी इंधन आणि मेडिकल क्षेत्रातील महागाईचा दर कायम आहे. शिवाय येत्या काळात तो वाढण्याची शक्यता आहे.
महागाई वाढण्याची कारणं कोणती आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ- जगभरातील महागाईसाठी कच्च्या तेलाच्या किमती वाढणं हे मुख्य कारण असल्याचं म्हंटलं जात आहे. कोरोना काळात मागणी कमी असल्याने कच्च्या तेलाचं उत्पादन घटलं होतं आणि याचा पुरवठा साखळीवर परिणाम झाला होता.
त्यानंतर मात्र मागणी वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली. त्यात कच्च तेल उत्पादन करणारे देशही तेलांच्या किमती जास्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठीच उत्पादनातही वेळेवेळी कपात करत आहेत.
खाद्य वस्तूंच्या किमतीत वाढ- फेब्रुवारी महिन्यामध्ये किरकोळ महागाई वाढण्यामागचं सर्वात मोठं कारण हे खाद्य पदार्थांच्या किमतीत झालेली वाढ हे होतं.
वस्तूंच्या किमतीत वाढ- भारतासह जगभरात महागाई वाढण्यासाठी मोठं कारण ठरलं ते म्हणजे वस्तूंच्या म्हणजेच कमोडिटीच्या किमतींमध्ये वाढ. करोनामुळे पुरवठा साखळी प्रभवित झाली. यामुळे कच्च्या तेलासह इतर अनेक वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या.
रशिया-युक्रेन युद्ध- रशिया हा कच्च्या तेलासोबतच खाद्यपदार्थांचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार देश मानला जातो. तर दुसरीकडे युक्रेनदेखील खाद्य पदार्थ आणि धातूंचा मोठा निर्यातदार देश आहे.
अशा परिस्थितीत दोन्ही देशांमध्ये युद्ध जुंपल्याने देशातून मोठ्या प्रमाणात होणारी वस्तूंची निर्यात थांबली आहे. त्यामुळे पुन्हा पुरवठ्यावर परिणाम झाल्याने खाद्यपदार्थ आणि धातूंच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.
भारतात काही क्षेत्रात महागाईच्या बाबतीत दिलासा मिळाला असला तरी मेडिकल क्षेत्रातील महागाई कायम आहे. आरोग्य सेवांचा महागाई दर हा फेब्रुवारीच्या तुलनेत वाढला आहे. फेब्रुवारीमध्ये ६.५ टक्क्यांवर असलेला महागाईचा दर मार्चमध्ये ६.५९ टक्क्यांवर पोहचला.
आरोग्य सेवांच्या दरात गेल्या सात महिन्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. नोव्हेंवर २०२२ पासून हा दर ६ टक्क्यांपेक्षा वरच राहिला आहे. औषधांच्या किमतीती वाढ हे या महागाईचं मुख्य कारणं आहे. फेब्रुवारीमध्ये ७.१५ टक्के असेलेली औषधांच्या किमतीतील वाढ ही मार्चमध्ये ७.२० एवढी होती.
हे देखिल वाचा-
RBIचा अंदाज
तृणधान्य, दूध आमि फळांच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई ही डिसेंबर २०२२ मध्ये ५.७ टक्क्यांवर होती ती मार्च २०२३ मध्ये ६.४ टक्क्यांवर पोहचली. दरम्यान RBI ने २०२३-२४ या आर्थिक वर्षात महागाईचा दर हा ५.२ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
महागाई रोखण्यासाठी RBI काय करते?
महागाई कमी करण्यासाठी आरबीआई रेपो रेटमध्ये वाढ करते. रेपो दरात वाढ करून RBI मार्केटमध्ये कॅश फ्लो कमी करते. ६ एप्रिलला आरबीआयने रेपो दर न वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तसचं महागाईच्या अंदाजातही कपात केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.