गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये अनेक फुटांपर्यंत पाणी पोहोचले आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 25-30 लोकांचा मृत्यू झाला आहे. लष्कराच्या तीन तुकड्याही बचाव कार्यात गुंतल्या आहेत.
दरम्यान, क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी आणि जामनगर उत्तरमधील भाजप आमदार रिवाबा जडेजा यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रिवाबा पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी खोल पाण्यात उतरत आहेत. रिवाबा बचाव कर्मचाऱ्यांसोबत पाण्यात जाऊन लोकांना मदत करत आहेत.
गुजरातच्या अनेक भागात पूरस्थिती गंभीर आहे. रिवाबा जडेजा यांनी स्वत: कंबरेइतक्या खोल पाण्यात उतरून पुरात अडकलेल्या लोकांना मदत केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. यादरम्यान रिवाबा यांनी सोशल मीडिया हँडलवर व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये, रिवाबा जडेजा खोल पाण्यात उभा राहून दोन घरांच्या मध्ये शिडी लावून लोकांना बाहेर काढणाऱ्यांना मदत करताना दिसत आहेत. हे काम करत असताना त्यांनी लोकांशी संवादही साधला.
रिवाबा जडेजा यांचा व्हिडिओ पाहून लोक त्यांचे खूप कौतुक करत आहेत. त्याचबरोबर रवींद्र जडेजानेही पत्नीचे कौतुक केले आहे.
रिवाबा जडेजाने एक्सवर शेअर केलेल्या बचाव कार्याच्या व्हिडिओवर रवींद्र जडेजाने कमेंट करत पत्नीचे कौतुक केले आहे.
दरम्यान एनडीआरएफ आणि राज्य बचाव पथकातर्फे वडोदरा शहराभोवती घरांमध्ये आणि गच्चीवर अडकलेल्या लोकांना वाचवण्यात येत आहे.
17 एप्रिल 2016 रोजी रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांचा विवाह झाला होता. त्यांची मुलगी निधीना हिचा 2017 मध्ये जन्म झाला.
रिवाबा यांनी 2019 मध्ये गुजरातचे कृषी मंत्री आरसी फाल्दू आणि जामनगरच्या खासदार पूनम मॅडम यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी जामनगर उत्तरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि आमदार म्हणून निवडून आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.