रस्त्यावर लुटमार होण्याच्या घटन सतत घडत असतात. रात्री-अपरात्री बाहेर फिरणाऱ्यांना गाठून लुटल्याचे प्रकार सामान्य असताना एक विचीत्र प्रकार दिल्लीत समोर आला आहे. चोरट्याने एका दाम्पत्याला लुटण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडे अवघे २० रुपयच सापडले. मग या लुटारूंनी त्यांना दुसऱ्यांदा तपासलं, पण तरीही त्याच्याकडं काहीही मिळालं नाही. मग शेवटी त्यांनी स्वतःच्या खिशातले १०० रुपये जोडप्याला दिले आणि ते दोघं फरार झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलं झालं.
पण गोष्ट इतक्यावरच संपली नाही. पोलिसांनी या घटनेनंतर जंग जंग पछाडलं आणि या अनोख्या 'दयावान' चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नेमकं झालं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २१ जून रोजी दिल्लीच्या शाहदरा येथे रात्री १० वाजून ५५ मिनीटांना पोलिसांना फोन आला. या फोनवर दोन बंदुकधारी एका जोडप्याला लुटण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती देण्यात आली. ही घटना घडत असताना शेजारच्या बिल्डिंगमधील एकाने या घटनेचा व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला. या व्हिडीओनुसार स्कूटीवर आलेल्या दोन तरुणांनी दाम्पत्याला बंदुक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान पोलिस घटनास्थळी पोहचले तेव्हा या पीडित दाम्पत्याने पोलिसांना सांगितेले की, त्या दोघांनी त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला, दाम्पत्याला त्यांनी दोनदा तपासलं. पण त्यांच्याकडे काहीच न मिळाल्याने त्यांनी दाम्पत्यालाच १०० रुपये देऊन ते दोघे पसार झाले. यानंतर दाम्पत्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलप ३९२/34 लुटमारीचा प्रयत्न आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गु्न्हा दाखल केला.
असे सापडले चोर
पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पोलिसांनी या परिसरातील २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं. तसेच १००हून अधिक लोकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. इतकेच नाही तर पोलिसांनी खबऱ्यांकडून देखील माहिती घेतली.यानंतर पोलिसांना एक आरोपी हर्ष राजपूत बद्दल माहिती मिळाली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी हर्षसोबत त्याचा साथिदार देव वर्मा याला देकील पकडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.