उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लखनऊच्या गोसाईगंजमध्ये काही बनावट साधूंना चप्पलने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हे लोक बाबांसारखे भगवे कपडे घालून लोकांना संमोहित करायचे आणि नंतर लूटमार करायचे असे बोलले जात आहे.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर स्थानिक लोकांनी या बाबांना चप्पलने बेदम मारहाण केली, ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता लखनऊ पोलिसांनीही या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. या लोकांना ताब्यात घेतले असून चौकशीनंतर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये भगवे कपडे परिधान केलेल्यांना स्थानिकांनी घेरल्याचे दिसत आहे. यावेळी अनेक लोक त्यांना चप्पलने मारहाण करत आहेत. एवढेच नाही तर काही लोकांनी या बाबांना लाथा-बुक्क्यांनीही मारहाण केली. स्थानिकांकडून मारहाण होत असल्याने हे लोक हात जोडत ओरडत असल्याचे दिसत आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
दरम्यान याच प्रकरणाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये हे लोक आपला गुन्हा कबूल करत आहेत. आम्हाला एक हजार रुपये मिळाल्याचे एका व्यक्तीने स्वतः सांगितले. तर, दुसऱ्याने सांगितले की, तो आदल्या दिवशी आला नव्हता. आणखी एकाने सांगितले की, त्याने स्वतः पैसे काढले नाहीत.
दरम्यान या सर्व प्रकरणावर पोलिसांनी निवेदन जारी केले आहे की, 'मारहाण झालेल्या सर्वांना स्थानिक पोलीस ठाण्यात सुखरूप आणण्यात आले आहे. लोकांनी या बाबांवर चोरीचा आरोप केला असून त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाईल.
या सर्वांना गोसाईगंज पोलीस स्टेशनच्या गंगाखेडा गावात साधूच्या वेशात पकडले असून, त्यांची नावे अमित, आकाश, सागर आणि अक्षय अशी आहेत. हे लोक आसिफाबाद, मेरठचे रहिवासी आहेत.
पोलसांनी पुढे सांगितले की, 'या लोकांचे वय 20 ते 25 वर्षे आहे. हे लोक अनेक दिवस साधूंच्या वेशात येथे फिरत होते. काल या लोकांनी एका माणसाला प्रसाद म्हणून काहीतरी खाऊ घातले त्यानंतर तो व्यक्ती बेशुद्ध झाला. त्यांनंतर त्याचे काही सामान पळवले. आजही हे साधू तिथे फिरत असताना लोकांनी त्यांना पकडले आणि चौकशी केल्यानंतर त्यांना मारहाण केली.
पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ धाव घेत या लोकांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.