सध्या सगळीकडे पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार, संततधार पाऊस तर यामुळे नद्या भरून वाहत असून काही भागांत पूर आल्याचं चित्र आहे. हे सगळं पाहून आपल्यालाही आपले लहानपणीचे दिवस आठवायला लागतील. लहानपणी पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येकाला मोठा पाऊस येऊन शाळेला सुट्टी मिळाली असं वाटायचं. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का? हे गाणं खरं ठरावं असं प्रत्येकाला लहानपणी वाटत होतं पण असं क्वचितच घडायचं.
तिच पिढी मोठी झाल्यावर मात्र प्रत्येकाला लहानपणीचे ते दिवस आठवतात, मनात त्या भावना कायम असतात फक्त जबाबदाऱ्या बदलेल्या असतात. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना पावसामुळे आपल्याला कामावर सुट्टी मिळत नाही हे अनेकांचं दु:ख असतं. या मॉडर्न पिढीच्या जुन्या गाण्याचं नवं व्हर्जन आता आपल्यासमोर आलं आहे. या गाण्याने थेट कॉर्पोरेट क्षेत्रातल्या कामगार वर्गाच्या भावनेलाच हात घातला आहे.
"सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? ऑफिसभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का?भोलानाथ... तळे साचून वर्क फ्रॉम होम मिळेल काय?" अशा आशयाचं हे गाणं असून सोशल मीडियावर हे गाणं चांगलंच व्हायरल झालं आहे. आपण जरी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असाल तरी हे गाणं आपल्याला आपलसं वाटेल. किमान वर्क फ्रॉम होम मिळेल अशी आशा प्रत्येक कर्मचाऱ्याला असते. त्यामुळे हे गाणं काम करणाऱ्या प्रत्येकाला लागू पडतं.
डिजीटल इन्फ्ल्युएन्सर योगेश तवार याने हे गाणं बनवलं आहे. सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर या गाण्याला चांगलीच पसंती मिळत असून नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर अनेकांनी हे गाणं शेअर केलं आहे. योगेश तवार हा तरूण वेगवेगळ्या प्रकारचे विनोदी व्हिडिओ बनवून नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.