Viral Video of Gymgirl Wearing a Saree- शरिराने तंदुरुस्त राहण्यासाठी आणि आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अनेकजण दररोज व्यायाम करतात. अनेकजण जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यास पसंती देतात. पुरुषांसोबत मोठ्या प्रमाणात महिला देखील जिममध्ये जाऊन व्यायाम करू लागल्या आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये महिला साडी नेसून जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे.
महिलेचा हा व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेकांनी महिलेचे कौतुक केले आहे. पण, काहींनी साडी घालून व्यायाम करण्यावर आक्षेप घेतला आहे. साडी घालून व्यायाम करणे अवघड असते. याशिवाय, जिममधील अनेक उपकरणांचा वापर करणे साडी नेसल्यामुळे करता येत नाही किंवा कठीण जातं.