हल्ली कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याची फॅशन चर्चेत आहे. जर तुम्हीही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही वापरत असलेला कॉन्टॅक्ट लेन्स तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. हो, सध्या असंच एक प्रकरण समोर आलंय. (shocking video goes viral)
एका महिलेच्या डोळ्यातून डॉक्टरांनी तब्बल 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढले. तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. यासंबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. (doctor has removed 23 contact lenses from a womans eyes )
सदर व्हिडिओत तुम्हाला दिसेल की एका महिलेच्या डोळ्यातून डॉक्टर एक-एक लेन्स बाहेर काढत आहे. धक्कादायक म्हणजे डॉक्टरांनी तब्बल 23 कॉन्टॅक्ट लेन्स महिलेच्या डोळ्यातून बाहेर काढले. पण सर्वात मोठा प्रश्न म्हणचे महिलेच्या डोळ्यात 23 कॉन्टॅक्ट लेन्स गेले कसे?
कॅलिफोर्निया येथे राहणारी हि महिला रोज रात्री झोपायच्या आधी लेन्स काढायला विसरत असे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चक्क नवीन लेन्स घालत असे. त्यामुळे तिच्या डोळ्यात तब्बल 23 कॉन्टॅक्ट लेन्स जमा झाल्या. जेव्हा महिलेला त्रास जाणवला, तेव्हा ही महिला डॉक्टरकडे गेली.
ज्या डॉक्टरनी ही 23 कॉन्टॅक्ट लेन्स काढली त्या डॉ. कॅटरिनाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. सोबतच कॉन्टॅक्ट लेन्स लावून चुकूनही झोपू नका असा सल्लाही या डॉक्टरने दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी या वर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.