Shravan 2024: बेलपत्रच नाही तर या झाडांनीही प्रसन्न होतात भगवान शंकर, अंगणात नक्की लावा

काहीजण या दिवसांमध्ये शिवभक्त भोलेनाथाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी काही जण बेलाचं पानं महादेवाला वाहतात. तर अनेकजण बेलाचं झाड घरी लावतात. पण...
Shravan Which plant besides bel patra is loved by Lord Shankara
Shravan Which plant besides bel patra is loved by Lord Shankara
Updated on

उत्तर भारतीयांच्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. तर, महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार 5 ऑगस्ट 2024 पासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण महिना सुरु होणार आहे. यावेळी 5 श्रावणी सोमवार येणार आहेत.

श्रावणात अनेक देवी-दैवतांची पूजा केली जाते. अनेक व्रत-वैकल्ये, उपवास केले जातात. तर काहीजण या दिवसांमध्ये शिवभक्त भोलेनाथाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी काही जण बेलाचं पानं महादेवाला वाहतात. तर अनेकजण बेलाचं झाड घरी लावतात. पण तुम्हाला माहितीय का, बेलाच्या झाडासोबत अशी काही रोपं आहेत ज्यामुळं भोलेनाथ प्रसन्न होतात. (Shravan Which plant besides bel patra is loved by Lord Shankara )

बेल पत्राच्या झाडासोबत महादेवाला प्रिय असणार झाडं आपण घरी लावली ती शुभ मानली जातात. इतकेच नव्हे तर, ज्योतिषी सांगतात की श्रावण असा महिना आहे. ज्यामध्ये काही झाडे लावल्याने माणसाचे नशीब बदलू शकते. तर आज आपण जाणून घेऊयात ती झाडं कोणती आणि कशी लावयची?

Shravan Which plant besides bel patra is loved by Lord Shankara
Shravan 2024: श्रावणात उपवासाला खमंग अन् खुसखुशीत साबुदाणा वडा खायचांय? मग, बनवताना 'या' चुका करणे टाळा

शमी

असे मानले जाते की, घरामध्ये शमीचे रोप लावल्याने तुमच्या कुटुंबावर भोलेनाथाचा आशीर्वाद येतो. हे रोप तुम्ही फांदी किंवा बियांच्या माध्यमातून कुंडीमध्ये लावू शकतो. हे रोप लावताना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. 6 ते 8 सेमी लांबीची फांदी घ्यावी लागेल आणि 3 ते 4 इंच खोलीवर त्याची कुंडीत लागवड करावी लागे. लागवड करण्यापूर्वी खालची पाने काढून टाकावी लागतील. दैनंदिन सिंचनाबरोबरच वेळोवेळी खतही द्यावे.

धोत्राचं रोप

धोत्राचं फुलच नव्हे तर फळेही भगवान शंकराला अर्पण केली जातात. श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवारी हे रोप घरामध्ये कुंडीत लावावे. नर्सरीमध्ये उपलब्ध असलेल्या बिया किंवा लहान रोपांच्या मदतीने धोत्र्याच्या रोपाची लागवड करता येते.

जर तुम्हाला बियांच्या मदतीने रोप लावायचे असेल तर सर्वप्रथम मातीमध्ये शेणखत मिसळा. आता एका भांड्यात कंपोस्ट माती भरा, त्यात पिकलेले बियाणे किंवा झाडे लावा आणि एक मग पाणी घाला. रोज एक ते अर्धा कप पाणी टाकून भांडे चांगले सूर्यप्रकाश असलेल्या जागी ठेवावे.

Shravan Which plant besides bel patra is loved by Lord Shankara
Shravan 2024: श्रावणात दही अन् 'या' भाज्या खाणे टाळा, जाणून घ्या त्यामागील वैज्ञानिक अन् आयुर्वेदीक कारण

चाफा

औषधी गुणांनी समृद्ध असणारं चाफ्याचे झालं घरात लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. ते लावण्यासाठी, मध्यम ते मोठ्या आकाराचे कुंडी आवश्यक आहे, ज्याच्या तळाशी अधिक छिद्रे असावीत जेणेकरून पाणी योग्यरित्या बाहेर पडेल.

50 टक्के कोको-पीट आणि 50 टक्के गांडूळ खत मातीत चांगले मिसळा. आता चाफ्याची फांदी 3 ते 4 इंच आत लावा आणि पाणी द्या. चाफ्याच्या फांदीला आधार देण्यासाठी, आपण त्यास दोरीने देखील बांधू शकता.

रुई

रुई वनस्पतीमध्ये भगवान शिव वास करतात असे मानले जाते. श्रावण महिन्यात या रोपाची लागवड केल्याने तुम्हाला भोलेनाथाचा आशीर्वाद मिळतो, यासाठी तुम्हाला लहान किंवा मध्यम आकाराची कुंडी खरेदी करावे लागेल.

आता या कुंडीमध्ये चांगल्या प्रतीची माती भरून त्यामध्ये रोपवाटिकेतील बिया किंवा रोपे लावा. याला जास्त पाणी लागत नाही कारण ही एक वाळवंटी वनस्पती आहे, म्हणून फक्त माती ओलसर ठेवा आणि जास्त पाणी देऊ नका. लक्षात ठेवा की बियाण्यांमधून रोप बाहेर येईपर्यंत भांडे उन्हात ठेवणे टाळावे.

Shravan Which plant besides bel patra is loved by Lord Shankara
Shravan 2024 : श्रावणात उपवास करताना घ्या काळजी; 'हे' पदार्थ खाल तर जाणवणार नाही थकवा

मनी प्लांट

असे म्हटले जाते की, श्रावणात महिन्यात मनी प्लांट लावल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते आणि आर्थिक संकट येत नाही. अशा परिस्थितीत मनी प्लांट कुंडीत लावण्याऐवजी त्याची मुळे आधी बाटलीत लावू शकता. जेव्हा मुळे दिसू लागतात तेव्हा ते एका भांड्यात स्थानांतरित करा. मनी प्लांटला वाढण्यासाठी आणि हिरवे राहण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता नसते, म्हणून माती कोरडी झाल्यावरच पाणी द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.