Bharat Jodo Yatra : खरगोनमधील भारत जोडो यात्रेत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा; काँग्रेसनं स्पष्ट केली भूमिका

'खरगोनमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.'
Bharat Jodo Yatra in Khargone Madhya Pradesh
Bharat Jodo Yatra in Khargone Madhya Pradeshesakal
Updated on
Summary

'खरगोनमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.'

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'दरम्यान (Bharat Jodo Yatra) मोठा वाद समोर आलाय. यात्रेदरम्यान 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या (Pakistan Zindabad) घोषणा दिल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केलाय.

मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्ष व्हीडी शर्मा (V D Sharma) यांनी एक व्हिडिओ ट्विट करून हा आरोप केलाय. खरगोनमध्ये पोहोचलेल्या राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेदरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याबद्दल राहुल गांधींनी देशाची माफी मागावी, काँग्रेसची देश तोडण्याची मानसिकता आता उघडकीस आलीय, असं ट्वीटमध्ये नमूद केलंय.

Bharat Jodo Yatra in Khargone Madhya Pradesh
Supreme Court चा ममता बॅनर्जी सरकारला मोठा दिलासा; CBI चौकशीच्या आदेशावर घातली बंदी

मध्य प्रदेश भाजपचे मीडिया प्रभारी लोकेंद्र पराशर यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिलं की, 'खरगोनमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून हे ट्विट करण्यात आलं आणि नंतर ते काढून टाकण्यात आलं. मात्र, काँग्रेसच्या मनात काय आहे हे सत्य समोर आलं आहे.'

Bharat Jodo Yatra in Khargone Madhya Pradesh
Belgaum : बसवर 'जय महाराष्ट्र' लिहून गाडीला फासलं काळं; कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा तात्काळ बंद

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी ट्विट केलं की, 'भाजपच्या डर्टी ट्रिक्सनं संपादित केलेला व्हिडिओ प्रचंड यशस्वी झाला. हा व्हिडिओ #BharatJodoYatra ला बदनाम करण्यासाठी प्रसारित केला जात आहे. यावर आम्ही तातडीनं कायदेशीर कारवाई करत आहोत.

Bharat Jodo Yatra in Khargone Madhya Pradesh
मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

भाजपच्या आरोपांचं खंडन करताना मध्य प्रदेशातील काँग्रेसचे प्रवक्ते केके मिश्रा म्हणाले, “आम्ही यात्रेदरम्यान अशी कोणतीही घोषणा ऐकली नाही. राहुल गांधींच्या समर्थनार्थ हजारो लोक बाहेर पडताना पाहून भाजपला धक्का बसला आहे. याउलट संघ आणि भाजपची विचारधारा असलेल्या कुणाला तरी या षडयंत्रासाठी रॅलीत पाठवलं गेलं असावं, असा आरोप मिश्रा यांनी केलाय. लोकेंद्र पराशर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.