Drowsy Driving Prevention: गाडी चालवताना एक डुलकीही पडू शकते महागात, जाणून घ्या ते कसे टाळावे?

How to Prevent Driver Sleepiness: अपघातांसाठी एक महत्वाचं कारण म्हणजे झोप. अपुरी झोप. किंवा अनेक तास सलग गाडी चालवल्याने आलेली एक डुलकी महागात पडू शकते
How to Prevent Driver Sleepiness
How to Prevent Driver Sleepiness
Updated on

How to Prevent Driver Sleepiness: महामार्गांवरून किंवा दुरचे प्रवास करत असताना तुम्ही रस्त्याशेजारी गाडी चालकाला सावध करणारे अनेक फलक वाचले असतील. ज्यात 'अति घाई, संकटात नेई', 'नजर हटी दुर्घटना घटी' अशा प्रकारच्या सुचना आपण वाचतो.

कोणतही वाहन Vehicle चालवताना चालकाने दक्ष असणं गरजेचं आहे हे त्याला चांगलचं ठाऊक असतं. मात्र असं असलं तरी दररोज हजारो अपघात Accidents हे होतचं असतात. या अपघातांसाठी एक महत्वाचं कारण म्हणजे झोप.

अपुरी झोप Sleep, किंवा अनेक तास सलग गाडी चालवल्याने आलेली एक डुलकी महागात पडू शकते. Small Nap during driving dangerous read tips to be awake

३० डिसेंबर २०२२मध्ये भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा Rishabh Pant अपघात झाला होता. या अपघातातून तो थोडक्यात बचावला. यावेळी त्याला गंभीर दुखापत झाली होती. काही काळ तो रुग्णालयात दाखल होता.

चौकशी दरम्यान ऋषभने त्याला गाडी चालवत असताना झोप आल्याने त्याचं गाडीवरील नियंत्रण गेलं ज्यामुळे गाडी डिव्हायडरवर आदळल्याची कबुली दिली. जे ऋषभच्या बाबतीत घडलं तसं दररोज अनेकांच्या बाबतीत घडत असेल. या अपघातातून ऋषभ तर वाचला.

पण असे काही असतील ज्यांना त्यांच्या एक डुलकीमुळे जीव गमवावा लागला असेल. इतकचं काय तर एका डुलकीमुळे म्हणजेच अपुऱ्या झोपेमुळे गाडी चालवताना आपण इतरांचाही जीव धोक्यात टाकत असतो. त्यामुळे ड्रायव्हिंग करत असताना झोप येणार नाही याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

१.ड्रायव्हिंग करत असताना झोप येण्यासाठी अनेक कारणं असतात यातील महत्वाचं कारण म्हणजे रात्रीची अपुरी झोप. प्रवासाला निघण्यापूर्वी जर चालकाने पुरेशी झोप घेतली नसेल तर काही तास गाडी चालवल्यानंतर पेंग येण्याची शक्यता अधिक असते.

यामुळे गाडी चालण्यासाठी लागणारी एकाग्रता कमी होवू शकते. यासाठीच लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी पुरेशी झोप होईल या प्रमाणे प्रवास प्लॅन करा. शक्यतो रात्रीचा प्रवास टाळा.

२. दुरच्या प्रवासापूर्वी मादक पदार्थांच सेवन करू नका. तसचं काही औषधांमुळे झोप येते. शक्य असल्यास अशी औषधं घेणं टाळा.

३. जर तुम्ही संध्याकाळनंतर किंवा रात्रीचा प्रवास करणार असाल तर चालकाने हलक जेवण करावं. जास्तीचं आणि जड जेवण केल्याने झोप येण्याची शक्यता जास्त असते.

हे देखिल वाचा-

How to Prevent Driver Sleepiness
Sleeping Habits : ज्यांची ८ तासात झोप पूर्ण होत नाही, त्यांना या काळात येते जास्त झोप

गाडी चालवताना झोप येणं टाळण्यासाठीचे उत्तम पर्याय

जर तुम्ही लाबंचा प्रवास करणार असाल तर अनेक तास सलग ड्रायव्हिंग करणं टाळा. प्रत्येकी ३-४ तासांनी एक ब्रेक घ्या. यावेळी गाडीतून उतरून पाय मोकळे करा. थोडी फार स्ट्रेचिंग करा जेणे करून तुमचं शरीरही रिलॅक्स होईल. यावेळी तुम्ही चहा किंवा कॉफी देखील घेऊ शकता. तसचं थंड पाण्याने तोंड धुवून पुन्हा प्रवास सुरू करा.

गाडी चालवताना केवळ म्युझिकप्रेमींनीच गाणी ऐकावी हे गरजेचं नाही. गाडीत गाणी लावल्याने झोप येण्याची शक्यता कमी होते. मात्र यावेळी गाण्याचा आवाज मोठा असू नये हे लक्षात घ्या. तसंच तुम्हाला रिफ्रेश करतील अशा गाण्यांची एखादी प्लेलिस्ट तुम्ही प्रवासाला निघण्यापूर्वी तयार ठेवली तर तुम्हाला झोप येणार नाही शिवाय तुम्ही प्रवासाची मजा लुटू शकता.

ड्रायव्हिंग करत असताना अनेकदा पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या जेणे करून तुमचं शरीर हायड्रेड राहील. तुम्हाला थकवा जाणवणार नाही.

अधून मधून काही हलके पदार्थ तुम्ही खावू शकता. जकं फूड खाणं टाळा. त्याऐवजी तुम्ही काही फळं सोबत ठेवू शकता किंवा एखादं चॉकलेट.

हे देखील वाचा

How to Prevent Driver Sleepiness
Yoga Tips : पार्टनरच्या घोरण्याने रोज होतेय तुमची झोप मोड? मग त्यांना लगेच लावा या आसनांची सवय

जर तुम्ही एखाद्या दुरच्या प्रवासाचा प्लॅन करत असाल तर शक्य असल्यास एकटं जाणं टाळा. तुमच्या सोबत जवळीची एखादी व्यक्ती असले तर त्याच्यासोबत संवाद साधणं शक्य होईल.

एकट्याने प्रवास करत असताना कुणाशीही बोलणं न झाल्याने झोप येण्याची शक्यता वाढते. तर सोबतीला कुणी असल्यास गप्पा गोष्टींमुळे झोप येत नाही आणि प्रवासही चांगला होतो.

प्रवासात सोबत कुणी असल्यास एक गोष्टी आवर्जुन लक्षात ठेवावी. सोबतीला असलेल्या व्यक्तीला झोपायचे असल्यास त्याने ड्रायव्हर शेजारील सीटवर बसून झोपणं टाळावं. यामुळे गाडी चालवणाऱ्या व्यक्तीलादेखील झोप येण्याची शक्यता वाढते. अशावेळी मागील सीटवर जाऊन त्याने झोप काढवी.

अलिकडे नव्या गाड्यांमध्ये फोनवर बोलण्यासाठी ब्लूटूथ स्पिकर्सची सुविधा असते. यामुळे फोन हातात न घेता किंवा हेडफोनचा वापर न करताही फोनवर बोलणं शक्य होतं.

सोबत कुणी नसेल आणि झोप येतेयं असं वाटल्यास अशा वेळी तुम्ही घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा मित्र-मैत्रिणीला फोन करून त्यांच्याशी गप्पा मारून शकता.

या ५ मिनिटांच्या फोन कॉलमुळे तुमची झोप जाऊ शकते. मात्र फोन कॉलवर गप्पा मारत असताना गाडी चालवण्याकडे पूर्ण लक्ष राहील याची काळीज नक्की घ्या.

काही तासांनी अधून मधून खिडकीच्या काचा खाली घ्यावा. जेणेकरून ताजी हवा येईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.

गाडी चालवत असताना या काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्ही झोप येणं टाळू शकता. अगदीच झोप अनावर झाल्यास सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवून विश्रांती घ्या. कारणं वेळेपेक्षा अधिक महत्वाचा आहे तो म्हणजे तुमचा आणि इतरांचा जीव हे लक्षात ठेवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()