Social Media Influencer: जगभरात इंटरनेट क्रांती झाल्यापासून लोकांच्या आयुष्यात खूप मोठे बदल झाले आहेत. इंटरनेट आणि तंत्रज्ञानामुळे माणसासाठी खूप गोष्टी सोप्या झाल्या आहेत. इतकेच नव्हे तर लोक आता इंटरनेट, सोशल मीडियाला आपल्या कलेची जोड देत लाखो-करोडोंची कमाई करत करत आहेत.
यामध्ये राजेश रवानी हे नाव आहे. झारखंडचे राजेश हे ट्रक ड्रायव्हर असून ड्राईव्हिंग करताना शूट केलेल्या व्हिडिओतून ते महिन्याला आता लाखो रुपये कमावतत आहेत. इतकेच नव्हे तर ते सध्या इंटरनेटवरील एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत. (Rajesh Rawani)
राजेश रवानी तो देशातील प्रसिद्ध यूट्यूबर्सपैकी एक आहेत. राजेश झारखंडमधील जामतारा येथील एक अनुभवी ट्रक चालक आहेत. राजेश आज यूट्यूब स्टार आहेत. त्यांनी YouTuber म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यूट्यूबवर त्यांचे 10 लाख 86 हजरा सब्सक्रायबर्स आहेत. ते त्यांच्या चॅनलवर ट्रकिंग आणि कुकिंगचे व्हिडिओ शेअर करत असतात. याच्या माध्यमातून ते महिन्याला लाखोंची कमाई करत आहेत.
अलीकडेच, सिद्धार्थ कन्ननसोबतच्या एका पॉडकास्टमध्ये राजेश रवानी यांनी आपल्या कमाईबद्दल सांगितले.
ट्रक चालवून महिन्याला 25 ते 30 हजारांची कमाई होत असल्याचे राजेश यांनी सांगितले. पण, YouTube वरील त्यांची कमाई व्ह्यूजनुसार बदलते, महिन्याला ती कधी 4 लाख असते तर कधी 5 लाख रुपये. त्यांनी आतापर्यंतची एका महिन्यात सर्वाधिक 10 लाख रुपये कमावले आहेत.
आपल्या प्रवासाविषयी बोलताना राजेश यांनी सांगितले की, एका भयंकर अपघातात त्यांच्या हाताला दुखापत झाली होती, तरीही त्यांनी ड्रायव्हिंग सुरूच ठेवले. पुढे त्यांनी हळूहळू व्हॉल्ग्स सुरू केले.
आज राजेश देशभरात प्रसिद्ध आहेत. एवढेच नाही तर आनंद महिंद्रा यांनीही राजेश यांचे केले आहे. आनंद महिंद्रा यांनी राजेश यांचे कौतुक करत त्यांना आपले प्रेरणास्थान म्हटले. ते म्हणाले की, तुमचे वय किती आहे आणि तुम्ही कोणते काम करत आहात याने काही फरक पडत नाही. नवीन तंत्रज्ञानाचा अविष्कार करून तुम्ही पुढे जात असाल, तर त्यासाठी अजिबात उशीर करू नये.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.