Super Women : हीच ती सुपर वूमन! 74 वर्षांच्या नोकरीत एका दिवसाचीही रजा नाही अन् नव्वदीत घेतली रिटायरमेंट..

एका महिलेने ७४ वर्षांच्या नोकरीत एकही सुट्टी न घेता काम करत तिच्या उत्तम कामाचा पुरावाच जणू दिलाय
Strong Women
Strong Womenesakal
Updated on

Wonder Women : कामावरून एका दिवसाची सुट्टी मिळाली की सगळेच कर्मचारी सुटकेचा श्वास सोडतात. मात्र काहींना त्यांच्या कामाबाबत एवढा आदर असतो की ते त्यांच्या कामाला वर्षाचे बारा महिने आणि चोवीस तास देतात. लोक ५५-६० च्या वयात साधारणत: रियाटरमेंट घेतात. मात्र एका महिलेने ७४ वर्षांच्या नोकरीत एकही सुट्टी न घेता काम करत तिच्या उत्तम कामाचा पुरावाच जणू दिलाय. जाणून घेऊया त्याबाबत सविस्तर.

वयाच्या ७४ व्या वर्षीसुद्धा वर्षभर काम केलं

टेक्सासमधील एका ९० वर्षाच्या महिलेने ७४ वर्षांच्या नोकरीत एकदाही सुट्टी न घेतल्याने तिचे सर्वत्र कौतुक सुरू आहे. फॉक्स न्यूजच्या एका रिपोर्टच्या मते, मेल्बा मेबेन (Melba Mebane) अलीकडेच डिलार्डच्या डिपार्टमेंटल स्टोअरमधून एका दिवसाचीही सुट्टी न घेता काम करत होत्या. नोकरीच्या संपूर्ण प्रवासात त्या एकदी सुट्टी न घेता रिटायर झाल्या.

स्टोअर मॅनेजरने मिस मेबेनला आईचा दर्जा दिला होता

फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, टायलरमध्ये डिलार्डचे स्टोअर मॅनेजर जेम्स सेन्जने सांगितले की, ते मिस मेबेनला ६५ वर्षांपासून ओळखतात. त्यांनी प्रत्येक ग्राहकांना समाधानापेक्षा जास्त लक्झरी अनुभव दिला. त्या प्रत्येक जबाबदारी घ्यायच्या. त्यांनी त्यांच्याखाली अनेकांना प्रशिक्षण दिले आणि उत्तम कर्मचारी बनवले.

Strong Women
Success Story : वयाच्या १८व्या वर्षी डॉक्टर, नंतर IAS अन् आता यशस्वी उद्योजक, कोण आहे ही व्यक्ती?

मिस मेबेनने एबीसीचे सहकारी KAKE शी बोलताना सांगितले की माझ्यासाठी स्टोअरमधला प्रत्येक दिवस हा आनंदाचा आणि समाधानाचा होता. आता रिटायमेंटनंतर मिस मेबेन वर्ड टूर आणि टेस्टी जेवणाचा बेत आखताय. त्यांच्या नोकरीतील दिवसांच्या उत्तम कार्याचं कौतुक करण्यासाठी आज एका पार्टीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. (viral news)

Strong Women
Viral News : पैसे भरण्याच्या ठिकाणी लिहिली जन्मरास, हा माणूस एकदम खास!

फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत मिस मेबेन (Strong Women) सांगतात अनेक प्रकारच्या महिलांसोबत काम करण्याचा माझा अनुभव उत्तम होता. माझ्या कार्यातून नक्कीच इतर महिलासुद्धा काम करण्यास प्रोत्साहित होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.