Video : शाळेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी गायलं 'अयि गिरि नन्दिनी'; नेटकरी झाले मंत्रमुग्ध, येथे पाहा Viral Video

Mahishasura Mardini Stotram Viral Video : देशात सध्या नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जात आहे.
Mahishasura Mardini Stotram Viral Video
Mahishasura Mardini Stotram Viral Video
Updated on

देशात सध्या नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जात आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एका शाळेतील व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओमध्ये शेकडो विद्यार्थी शाळेच्या परिसरात 'महिषासुर मर्दिनी स्तोत्र' मोठ्या आत्मविश्वासाने गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून लोक विद्यार्थ्यांच्या गायन कौशल्याची स्तुती करताना दिसत आहेत.

'प्रिन्स_एडुहब_ (prince_eduhub_) या नावाने अकाउंट असलेल्या इंस्टाग्राम वापरकर्त्याने हा व्हिडीओ शेअर केला असून, यामध्ये शाळेच्या कॅम्पसमध्ये 'अयि गिरि नन्दिनी...' गाताना विद्यार्थ्यांचा एक गट दिसत आहे. या विद्यार्थ्यांच्या गायनाने नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. हे विद्यार्थी शाळेच्या गणवेशात सुरता अयि गिरि नन्दिनी गात आहेत. हे स्त्रोत संस्कृतमध्ये असून ते दुर्गा मातेला समर्पित आहे.

Mahishasura Mardini Stotram Viral Video
Vidhansbha Election : विधानसभेच्या रणधुमाळीत शरद पवारांची क्रेझ! राज्यभरातून मिळाले इच्छुकांचे 'इतके' अर्ज

संस्कृत श्लोक असलेले 'महिषासुर मर्दिनी स्तोत्र' शाळेतील विद्यार्थी अगदी सहजपणे गात असल्याने हा कौतुकाचा विषय ठरत आहे. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या संखेने लोक यावर कमेंट करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओवर ६३ हजार कमेंट्स करण्यात आल्या आहेत. इतकेच नाही तर या व्हिडीओला ४२ मिलीयनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि तब्बल पाच मिलीयनहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे,

Mahishasura Mardini Stotram Viral Video
गोफण | सुखाची झोप उडाली, वस्तादांचा मोठा गेम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.