Success Story : लॉकडाउनमध्ये कॉलेज सोडणारी 20 वर्षाची तरुणी दिवसाला कमावतेय 8 लाख! असं काय केलं तिने?

ही मुलगी नेमकी कोण आहे आणि तिच्या यशस्वी प्रवासाबाबत थोडक्यात जाणून घेऊयात
Success Story
Success Storyesakal
Updated on

Success Story : कोरोना महामारीनंतर अनेकांच्या आयुष्यात मोठी कायापालट झाली आहे. कोरोनंतर अनेकांच्या पोटापाण्याचे प्रश्न सुटलेत तर काहींवर उपाशी राहाण्याची वेळ आली. मात्र अशातच वीस वर्षीय एका मुलीची सक्सेस स्टोरी सगळीकडे चर्चेत आलीय. ही मुलगी तिच्या ग्रॅज्युएशनच्या अभ्यासासह एका रूममध्ये विद्यार्थ्यांची शिकवणी(ट्यूशन) घेत पैसे कमावायची.

मात्र लॉकडाउनमध्ये तिने शिक्षणासह शिकवणी वर्गही बंद केलेत. तिने लॉकडाउनदरम्यान स्वत:चा ब्रँड तयार केला आणि आज ती दिवसाला ८ लाख कमावतेय. ही मुलगी नेमकी कोण आहे आणि तिच्या यशस्वी प्रवासाबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे राहणारी 'क्लो झू' तिच्या छोट्या फ्लॅटमधून दिवसाला 8 लाख रुपये कमावते. व्यवसाय सुरू केल्यानंतर क्लो ने तिच्या पालकांना तिच्या शिक्षण सोडण्याबद्दल सांगितले नाही. एके रात्री घरातील सर्वजण जेवत असताना तिच्या भावाने तिचे गुढ उघड केले.

क्लोने 7 न्यूजला दिलेल्या माहितीत सांगितले की,"माझ्या पालकांना मी विद्यापीठातून बाहेर पडल्याचे सुमारे आठ महिने माहित नव्हते. एका रात्री जेवणाच्या टेबलावर, माझ्या भावाने जेव्हा हे सत्य उघड केले तेव्हा, कुटुंबापुढे मोठा गौप्यस्फोटच झाला.

क्लोने हे सगळं तिच्या स्वत:च्या बळावर केले होते. कोविडमुळे देशात लॉकडाऊन सुरू होते. शाळा-कॉलेजच्या दुकानांना आणि पार्लरमध्ये कुलूप लटकले होते. याच काळात तिला मॅन्युक्युअरची गरज भासली. तेव्हा तिने यावर विचार केला आणि नेलपॉलिशचा स्वतःचा ब्रँड उघडला. मात्र, याआधी क्लोने त्यावर खूप संशोधन केले होते.

Success Story
Success Story: रस्त्यावरील वस्तू विक्री ते शोरूमची मालकीण! वणी येथील पावविक्रेत्या पुष्पाताई बनल्या उद्योजिका..

न्यू साउथ वेल्समधील हायस्कूलमध्ये असताना क्लोला एक प्रतिभावंत विद्यार्थी म्हणून ओळखले जात असे. तिने हायस्कूल परीक्षेत ९९.५ म्हणजेच ऑस्ट्रेलियन टेरिटरी अॅडमिशन रँक (ATAR) मिळवले. त्या स्कोअरच्या आधारे तिला पदवी स्तरावर फायनान्स आणि कॉम्प्युटर सायन्स शिकण्याची संधी मिळाली. (Motivational Story)

उच्च शिक्षणाची संधी असूनही क्लोला करियरमध्ये कोणतीही दिशा मिळू शकली नाही. ती म्हणाली, "मी कोणता मार्ग निवडणार आहे याची मला स्पष्ट कल्पना नव्हती," पण तिला माहित होते की ती भविष्यात फायनान्स किंवा कॉम्प्युटर सायन्समधून करिअर करेल. लॉकडाऊन दरम्यान नेल सलून न सापडल्याने क्लोने व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला.

Success Story
Success Story : KBC ज्युनिअरमध्ये त्याने जिंकले होते 1 कोटी, नंतर डॉक्टर अन् आता IPS, कोण आहे हा व्यक्ती?

क्लोने स्वतःचा नेल ब्रँड (Company) तयार करण्यासाठी रात्रंदिवस संशोधन केले. ती म्हणाली, "मी माझा लॅपटॉप घेऊन रात्रंदिवस मार्केट संशोधन केले, बाजारात कोणती उत्पादने आहेत? ती कोण बनवत आहेत किंवा कशाची मागणी आहे यावर मी संशोधन सुरू केले, असे तिने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.