स्वामी अविमुक्तेश्वरानंदांच्या गुरुने पंतप्रधानांना दिलेला शाप खरा ठरला होता ?

स्वामी अविमुक्तेश्वरानंदांचे गुरु स्वामी करपात्री महाराज यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना शाप दिला होता.
Swami Avimukteswarananda Guru Swami Karpatri Maharaj Gave Curse To Former Pm Indira Gandhi
Swami Avimukteswarananda Guru Swami Karpatri Maharaj Gave Curse To Former Pm Indira Gandhi
Updated on

ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर ''ज्या लोकांनी विश्वासघात केला, ते हिंदू असू शकत नाहीत” असं मोठं वक्तव्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यांमुळं राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.

दरम्यान ते ज्या ज्योतिर्मठ पिठाचे शंकराचार्य आहेत त्याच्याशी जोडल्या गेलेल्या गुरु स्वामी करपात्री महाराज यांचा एक किस्सा समोर आला आहे.

या स्वामी करपात्री महाराजांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना शाप दिला होता. आणि तो खरा ठरल्याचे सांगण्यात येतं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी स्वामी करपात्री महाराज यांना खुप मानत होत्या. त्यांच्या आदर करत होत्या. पण त्यांना दिलेली अनेक वचनं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी निभावली नाहीत. त्यामुळं स्वामी करपात्री महाराज यांनी इंदिरा गांधींना शाप दिला होता.

Swami Avimukteswarananda Guru Swami Karpatri Maharaj Gave Curse To Former Pm Indira Gandhi
Shankaracharya Swami Avimukteshwaranand : विश्र्वासघात करणारा हिंदू नसतो;विश्र्वासघात करणारा हिंदू नसतो

नेमकं काय घडलं होतं?

ही गोष्ट 1965 च्या आसपासची आहे. देशात विनोबाजी भावे आणि इतर साधू-संतांच्या नेतृत्वाखाली, गोहत्या थांबवण्यासाठी आणि गोरक्षणासाठी कठोर कायदे आणण्यासाठी देशात मोठे आंदोलन झाले. हा तो काळ होता जेव्हा इंदिरा गांधी वाराणसी मधील ‘धर्मसम्राट करपात्री महाराजांचा’ खूप आदर करत होत्या. मात्र, तो निवडणुकीचा काळ होता.

असं सांगण्यात येतं की, इंदिरा गांधींनी महाराजांना वचन दिले होते की, जर आपण निवडणुका जिंकल्या तर त्या सर्व गोहत्या जे ब्रिटिश राजवटी पासून सुरू होते बंद करतील. पण तसं घडलं नाही.

इंदिरा गांधी निवडणुका जिंकल्या पण दिलेल्या शब्दाप्रमाणे त्या वागल्या नाहीत. त्यांनी संसदेत गोहत्या बंदी विधेयक मांडले नाही. तसेच त्यावर काही चर्चा ही करण्यात आली नाही. अनेकदा मागणी करूनही इंदिरा गांधी यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.

Swami Avimukteswarananda Guru Swami Karpatri Maharaj Gave Curse To Former Pm Indira Gandhi
Swami Avimukteswaranandan: "उद्धव ठाकरेंचा विश्वासघात करणारे हिंदू नाहीत""; PM मोदींना आशीर्वाद देणारे शंकराचार्य मातोश्रीवर काय म्हणाले?

करपात्री महाराज हे स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांचे शिष्य होते. तसेच ते गोरक्षणाचे खंबीर समर्थक देखील होते. गोरक्षण कायद्याच्या आश्वासनानंतरच त्यांनी इंदिराजी यांना पाठिंबा दिला होता. निवडून आल्यावर जेव्हा इंदिराजी या संदर्भात टाळाटाळ करायला लागल्या, तेव्हा त्यांना आठवण करून देण्यासाठी करपात्री महाराजांना आंदोलन करावे लागले होते.

गोहत्याबंदी आणि गोरक्षणाच्या मुद्द्यावर कायदा व्हावा या मागणीसाठी देशभरातील लाखो साधू-संत, गोरक्षक यांनी 1966 दरम्यान दिल्लीत संसद भवनावर मोर्चा काढला व संसदेबाहेर धरणे धरले. तेव्हा करपात्री महाराज रामचंद्र वीर यांच्यासोबत होते, रामचंद्र वीर ज्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली होती.

करपात्री महाराज आणि इतरांच्या नेतृत्वाखाली संत संसदेकडे कूच करत होते, तेव्हा महिलाही मोठ्या संख्येने होत्या. संसदेबाहेर धरणे देऊन आपल्या मागणीसाठी ते सारेजण खूपच आग्रही दिसत होते.

आपल्याकडे दुर्लक्ष केले जातेय हे लक्षात आल्यावर हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील तत्कालीन जनसंघाचे खासदार स्वामी रामेश्वरानंद यांनी आंदोलनकारी संतांना सांगितले, की संसदेत प्रवेश करा आणि खासदारांना बाहेर काढा, मगच गोहत्या थांबवण्यासाठी काहीतरी कायदा केला जाईल.

त्यांचा मोर्चा संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागला. या संपूर्ण घटनेनंतर इंदिराजींनी जमावावर गोळीबाराचे आदेश दिल्याचे सांगितले जाते.

अंदाधुंद गोळीबार करण्यात आला, ज्यात शेकडो संत आणि गोरक्षकांना प्राण गमवावे लागले. यावेळी दिल्लीत संचारबंदी लागू झाली होती. अनेक संतांना तुरुंगात टाकले गेले.

Swami Avimukteswarananda Guru Swami Karpatri Maharaj Gave Curse To Former Pm Indira Gandhi
Swami Samarth Prakatdin: स्वामी समर्थांचा व्हायरल होणारा ‘तो’ फोटो खरा आहे का?

अनपेक्षितपणे झालेल्या गोळीबारामुळे आणि इंदिरा गांधी यांच्या विश्वासघाताने करपात्री महाराज व्यथित झाले. आपल्या अनेक सहकार्‍यांना मृत्यूमुखी पडलेले पाहून ते उद्विग्न झाले आणि त्यांनी इंदिरा गांधी यांना शाप दिला,की “ज्याप्रमाणे तू या साधू संतांवर गोळीबार करून त्यांची हत्या केलीस तशीच हत्या तुझीही होईल.”

साधूंच्या हत्येचा आघात करपात्री महाराज यांना सहनच झाला नाही. योगायोगाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी करपात्री महाराजांनी शाप दिला होता तो दिवस गोपाष्टमीचा होता आणि ज्या दिवशी इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या अंगरक्षकांनी गोळ्या झाडून केली तो दिवस देखील गोपाष्टमीचाच होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.