Swiggy Delivery Agent Video : ऑनलाईन फुड डिलीव्हरी बॉईजबद्दल आपण अनेक तक्रारींचा पाढा वाचला किंवा ऐकला असेल. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमध्ये स्विगीच्या डिलिव्हरी एजंटने केलेल्या कामाचं नेटकऱ्यांकडून अक्षरक्षः तोंड भरून कौतूक केले जात आहे. काहींनी तर हा खरा हिरो असल्याच्याही भावना व्यक्त केल्या आहे.
सध्या अनेक शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप घेताना दिसत आहे. यामुळे अनेकांचा मौल्यवान वेळ वाहतूक कोंडीतच जात आहे. मात्र, व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक स्विगी डिलिव्हरी एजंट ट्रॅफिक पोलिसाची भूमिका बजावताना दिसून येत आहे. श्रीजीत नायरने लिंक्डइनवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये स्विगीचा एजंट रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवताना दिसून येत आहे. सध्या ही नायर यांची ही ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना नायर यांनी लिहिले आहे की, 'मी 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आणि अचानक ट्रॅफिक पुढे जाऊ लागले. त्यामुळे मनाला जरासे हायसे वाटले. थोडा पुढे गेल्यानंतर स्विगीचा हा एजंट वाहतूक कोंडी सोडवताना दिसला. हा व्हिडीओ कुठे शूट करण्यात आला आहे हे कळू शकलेले नाही.
हा व्हिडिओ शेअर केल्यापासून आतापर्यंत 2,000 हून अधिक नागरिकांनी लाईक्स आणि अनेक कमेंट्स केल्या आहेत. तर अनेकांनी या कामासाठी स्विगी एजंटचे कौतुक केले आहे. तर, खुद्द स्विगीने या व्हिडिओवर कमेंट करत 'सर्व हिरो कॅप घालत नाहीत, काही स्विगी जॅकेट घालतात!' असे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.