Video Viral : No Parkingमधील वाहने उचलणाऱ्या गाडी चालकाकडे ना लायसन्स, ना परवानगी? ठाण्यातील प्रकार

ठाण्यातील उपवन येथे हा प्रकार घडला असून त्यांच्याकडे वाहने उचलण्याची कुठलीच परवानगी नसल्याचा आरोप व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
Video Viral : No Parkingमधील वाहने उचलणाऱ्या गाडी चालकाकडे ना लायसन्स, ना परवानगी? ठाण्यातील प्रकार
Updated on

मुंबई : नो पार्किंगमधील वाहने उचलणाऱ्या वाहतूक विभागाच्या काही लोकांकडे परवानगीही नाही आणि टोईंग वाहन चालवणाऱ्या गाडी चालकाकडे लायसन्ससुद्धा नसल्याचा आरोप एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ठाण्यातील उपवन परिसरातील असून ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. चेतन चिटणीस यांनी वाहतूक पोलिस विभागावर हा आरोप केलाय.

"शुक्रवार दि १८ ऑगस्ट २०२३ रोजी ठाण्यात उपवन तलावाजवळ चेतन चिटणीस याने चुकीच्या पद्धतीने वाहने उचलणाऱ्या आणि लुटालुट करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांबरोबर खडाजंगी करून सगळ्या गाड्या सोडायला लावल्या. गाड्या उचलून नेणाऱ्या व्हॅनच्या ड्रायव्हरकडे लायसन्स नव्हतं. गाड्या उचलण्याची कारवाई करण्याची परवानगी असल्याची कागदपत्रे नव्हती."

"योग्य पात्रतेचा अधिकारी गाडीमध्ये उपलब्ध नव्हता. गाड्या उचलण्याचं काम करणाऱ्या मुलांकडे कुठलीही पद्धतीचे अधिकृत ओळखपत्र नव्हती. तरीही हे लोक गाड्या उचलून ५००/७००₹ वसूल करतात." असा आरोप या ट्वीटच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

Video Viral : No Parkingमधील वाहने उचलणाऱ्या गाडी चालकाकडे ना लायसन्स, ना परवानगी? ठाण्यातील प्रकार
मुलीचा मृत्यू झाला, अंत्यसंस्कारही झाले! त्यानंतर तिचाच वडिलांना Video Call आला अन्...; थरकाप उडवणारी घटना

दरम्यान, प्रदीप शिरसाठ हे वाहतूक पोलिस कर्मचारी या व्हिडिओमध्ये दिसत असून गाड्या उचलण्यासाठी असलेल्या मुलांकडे असलेले ओळखपत्रही खोटे असून गाड्या उचलण्याची लेखी परवानगीही त्यांच्याकडे नाही, त्याचबरोबर गाड्या उचलण्याआधी त्यांनी भोंगा लावून सूचना द्यायला पाहिजेत तेही देण्यात येत नसल्याचा आरोप या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.