Trending : माकडांची टोळी ठरली देवदूत , तरूणाने चिमुरडीला कोपऱ्यातं नेलेलं माकडांनी पाहिलं अन्...  

Uttar Pradesh Crime News : लोकांचा असा विश्वास आहे की साक्षात मारूतीरायाने मुलीसोबत वाईट घटना घडण्यापासून वाचवले!
Trending
Trending esakal
Updated on

Trending :

सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अत्याचार होणाऱ्या मुलींमध्ये अगदी ३ ४ वर्षांच्या मुलीही आहेत. हे पाहून आपलं मन घाबरतं. पण, काहीवेळा आपल्या आसपास अशा घटना घडतात ज्या आश्चर्यचकीत करणाऱ्या असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

माकडांनी हल्ला केला, माकडांनी बालिकेला जखमी केलं, अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, आता अशी एक घटना घडलीय. जी ऐकून अनेकांनी माकडांचे आभार मानले आहेत. अन् त्याचे कौतुकही केले आहे.

उत्तर प्रदेशातील बागपत येथे एका तरुणाने छोट्या मुलीला गोड बोलून बाजूला नेले. तो तिच्यासोबत काहीतरी चुकीचं करणार असं वाटत होतं. पण अचानक त्याच्यावर पाच-सहा जणांनी हल्ला केला. हा हल्ला कोणी व्यक्तींनी नाही तर चक्क माकडांनी केला.

Trending
Navratri Fashion Trend : नवरात्रीला चारचौघीत उठून दिसायचंय तर या अभिनेत्रींपासून घ्या टिप्स, दिसाल ट्रेंडी अन् फॅशनेबल

होय, उत्तर प्रदेशातील बागपत येथील ही घटना आहे. एक तरूण 6 वर्षांच्या मुलीला बळजबरी करून आपल्यासोबत नेले. तेथे त्याने तिच्याशी गैरवर्तन सुरू केले. मात्र त्यानंतर माकडांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला, त्यामुळे तो तरुण तेथून पळून गेला. त्यामुळे मुलीचे प्राण वाचले.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. एका 6 वर्षाच्या निष्पाप मुलीला तरूणाने निर्जनस्थळी नेले. त्यावेळी मारूतीरायाचे अवतार असलेल्या माकडांनी ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Trending
Trending : मूर्ती लहान पण किर्ती महान! PM मोदींनी पाळलेल्या गायीच्या या गोष्टी तुम्हालाही आश्चर्यचकीत करतील!  

बागपत येथील डोला गावात ही घटना घडली. मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, माकडांच्या टोळक्याने आरोपीवर हल्ला केला नसता तर काहीही होऊ शकले असते. मी याचा विचारही करू शकत नाही, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले.  

मुलगी UKG च्या वर्गात शिकते. ती शाळेतून घरी आली आणि बाहेर खेळायला गेली. तेव्हा संबंधित तरूणाने तिला गोड बोलून स्वत:कडे बोलावलं. ती मुलगीही त्याच्या मागे गेली. त्याने तिला गर्दी नसलेल्या ठिकाणी नेलं. अन् तिथे माकडांनी या तरूणावर हल्ला केला. या तरूणाची चांगलीच धुलाई केली.

यानंतर घाबरलेली मुलगी पळत घरी आली तिने आईला सर्वकाही सांगितले. आमच्या मुलीच्या रक्षणासाठी साक्षात बजरंबली आले नसते, तर काय झालं असतं? केवळ बजरंगीने माझ्या निरागस मुलीचे प्राण वाचवले आहेत. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून, आरोपीचा शोध सुरू आहे. त्याला पकडण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत.

Trending
BB Marathi 5 : निक्कीचे चाहते वोटींगमध्ये लावतायत जोर, घराबाहेर होणार कोण? वाचा Opening Voting Trends

ही बाब खरोखरच आश्चर्यकारक आहे. हे प्रकरण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. लोकांचा असा विश्वास आहे की साक्षात मारूतीरायाने स्वतः येऊन मुलीचे प्राण वाचवले. पोलिसांनी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.