एखाद्या विशिष्ट प्रदेशात प्रवास करण्यासाठी प्राण्यांचा वापर केला जातो. तसे वाळवंटातील प्रवास सुखकर होण्यासाठी उंटाची सवारी केली जाते. उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात. जे अनेक दिवस पाणी पिल्याशिवाय राहू शकते. हा प्राणी वाळवंटात आढळणारा निवडुंग मोठ्या उत्साहाने खातो.
अशा या उंटाला लिंबू खाऊ घातल्यावर त्याला काय वाटलं असेल याचा विचार करा. असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असे म्हणता येईल की, कदाचित उंटाला त्या लिंबाची चव आवडली नसेल.