Trending : ‘शेळीकडं रागानं का बघितलंस’ तरूणाची वृद्ध महिलेला मारहाण अन् धमकी!

'शेळीकडे रागानं का पाहिलंस,असे विचारल्यावर एका तरूणाने वृद्ध महिलेला मारहाण केली आहे'
Trending
Trending esakal
Updated on

Trending :

आजकाल कोणत्याही मुद्द्यावरून भांडण,वाद पोलिस केस होत आहेत. कधीकधी या वादात तरूणांनी टोकाचं पाऊल उचललेलं पहायला मिळतं. तो माझ्याकडे रागानं पाहत होता, असं म्हणून तरूणांच्या ग्रूपमध्येच तुंबळ मारामारी होते. पण, आता देशात एक वेगळीच घटना घडली आहे.

शेळीकडे रागानं का पाहिलंस,असे विचारल्यावर एका तरूणाने वृद्ध महिलेला मारहाण केली आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधील रांझी पोलिस स्टेशन परिसरातील करोंदी येथे ही घटना घडली आहे. या घटनेत वृद्ध महिला जखमी झाली आहे. तर संबंधित तरूण पळून गेला आहे.

Trending
Trending : IAS अधिकाऱ्याचं कुत्रं हरवलं, इन्फ्लुएंसरनी पोलिसांपेक्षाही कमी वेळात शोधून दाखवलं!

त्या वृद्ध महिलेने सांगितले की, तो तरूण इथे जवळच राहतो. तो त्याच्या शेळीकडे पाहत होता.मी सहजच त्याला म्हणाले की,तू शेळीकडे असे का पाहत आहेस, त्यावर तो चिडला अन् मला शिव्या देऊ लागला. माझ्या अंगावर धावून आला. तसेच, मला काठीने मारू लागला. मी ओरडू लागले तेव्हा शेजारील लोक आमच्याकडे धावत आले. तेव्हा तो मला धमकी देऊन पळून गेला.

रांझी पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकारी रमन सिंह यांनी सांगितले की, ही घटना २२ ऑगस्टची आहे. रात्री नऊ वाजता ही घटना घडली. ७२ वर्षांच्या कौशल्य बेन यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. तिने तक्रारीत म्हटले आहे की, मी रात्रीच्या जेवणानंतर घराबाहेर उभी होते. गल्लीत राहणारा कृष्णा सेन त्याच्या शेळीला रागाने पाहत होता.

Trending
मुंबईतील दलित मतदानाचा कल आघाडीकडे?

यावर अर्वाच्च भाषेत शिविगाळ करत महिलेला काठीने मारहाण केली. कौशल्या बेन रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. तेव्हा त्यांच्या नातवांनी त्यांना उठवलं तेव्हा कृष्णा पळून गेला.

या घटनेची नोंद पोलिसात केली आहे. पोलिस या कृष्णा सेनचा शोध घेत आहेत. आम्ही या प्रकरणाचा लवकर छडा लावू, आरोपीला शोधून काढू अशी हमी पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.