Trending News: इंटरनेटवर ट्रेंडिग होतायत 'हे' महत्त्वाचे प्रश्न; यांची उत्तरं माहित आहेत का?

या प्रश्नांची उत्तरे आम्ही इथे देणार आहोत. या प्रश्नांची मदत तुम्हाला परिक्षेमध्ये नक्कीच होऊ शकते.
Questions
QuestionsSakal
Updated on

स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या लोकांची संख्या भरपूर आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी जनरल नॉलेज हा विषय खूप महत्त्वाचा असतो. सध्या इंटरनेटवर काही प्रश्न ट्रेंडिंग आहेत. या प्रश्नांची उत्तरे आम्ही इथे देणार आहोत. या प्रश्नांची मदत तुम्हाला परिक्षेमध्ये नक्कीच होऊ शकते.

  • भारतातल्या कोणत्या राज्यामध्ये हत्तींची संख्या सर्वाधिक आहे?

    - भारतामध्ये सर्वात जास्त हत्ती कर्नाटक राज्यामध्ये आढळतात.

  • कोणत्या फळाच्या बियांमध्ये विष आढळतं?

    - सफरचंद या फळाच्या बियांमध्ये विष आढळतं.

  • कोणती अशी गोष्ट आहे जी दुसऱ्यांदा गरम केल्यास विष बनते?

    - रताळं जर दुसऱ्यांदा गरम केलं, तर त्यामध्ये विष तयार होतं.

  • भात दुसऱ्यांदा गरम केला तर काय होतं?

    - भात दुसऱ्यांदा गरम केला तर त्यामुळे फूड पॉईझनिंग होण्याची शक्यता वाढते. पण फक्त गरम होणंच नव्हे तर भात झाकून ठेवण्याची पद्धतही याचं कारण ठरू शकते.

Questions
अविश्वसनीय! विदर्भातील या गावात चक्क डायनासोर द्यायचे अंडी; काही वर्षांपूर्वी सापडले होते अवशेष
  • कोणत्या भाज्यांमध्ये सर्वाधिक उष्णता असते?

    - गाजर, बटाटा, कांदा, लसूण, मुळा, रताळं अशा कंदवर्गीय भाज्यांमध्ये उष्णता जास्त असते.

  • कोणती अशी गोष्ट आहे की जी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही गरम राहते?

    - या प्रश्नाचं उत्तर ऐकून थोडं विचित्र वाटेल. पण याचं उत्तर आहे गरम मसाला.

  • निळ्या रंगाचं अंडं देणारी कोंबडी कोणत्या देशामध्ये आढळते?

    - निळ्या रंगाचं अंडं देणारी कोंबडी चिली या देशात आढळते.

  • कोणत्या व्हिटमीनच्या कमतरतेमुळे त्वचेवर सुरकुत्या येतात?

    - व्हिटमीन सी च्या कमतरतेमुळे त्वचेवर सुरकुत्या येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.