Trending News : एक घर, १८५ सदस्य, ८४ खोल्या अन् ६५ किलो पीठाच्या चपात्या; परिवार आहे की गाव?

अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान यांनी या कुटुंबाची भेट झाली. या भेटीनंतरच हे कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात आले
Rajasthan Family
Rajasthan FamilySakal
Updated on

आजच्या युगामध्ये बरेचसे लोक छोट्या कुटुंबाला प्राधान्य देतात. पूर्वीसारखी एकत्र कुटुंब पद्धती फारशी दिसून येत नाही. पण राजस्थानमध्ये एक कुटुंब आहे, ज्यामध्ये १८५ सदस्य आहेत.

हे कुटुंब अजमेरच्या रामसर गावातील आहे. माळी समाजाच्या या कुटुंबात १८५ सदस्य आहेत. त्यांच्या घरामध्ये ८४ खोल्या आहेत ज्या ६ घरांमध्ये विभागल्या आहेत. या कुटुंबाकडे ७०० बिघे जमीन आहे.

अलीकडेच अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री सारा अली खान देखील त्यांच्या 'थोडा हटके थोडा बचाके' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजमेरला आले असताना या कुटुंबाची भेट झाली. या भेटीनंतरच हे कुटुंब प्रसिद्धीच्या झोतात आले आणि मग हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं कुटुंब असल्याची माहिती मिळाली.

Rajasthan Family
Trending News : झोपडपट्टीतली मलेशा बनली फॅशन आयकॉन; १५ वर्षांच्या युवतीची चर्चाच चर्चा

अजमेरच्या ज्या कुटुंबाबद्दल आपण बोलत आहोत ते राजस्थानमधल्या रामसर गावातलं आहे. मोहनलाल माळी असं त्याच्या प्रमुखाचं नाव आहे. त्यांच्या कुटुंबात ३-३ पिढ्या राहत आहेत. या कुटुंबात एकूण १८५ सदस्य आहेत. कुटुंबात, मोठ्यांपासून लहानापर्यंत, ते घरातील कामाचं वाटप करतात जेणेकरून कोणावरही कामाचा भार पडू नये आणि सर्वांनी मिळून काम करावे.

मोहनलाल माळी यांच्या कुटुंबातील एक सूनही गावची सरपंच आहे. सरपंच झाल्यानंतर या कुटुंबाचा गावात चांगलाच दबदबा निर्माण झाला. पण या घराण्याने गावात कधीच आपला दबदबा दाखवला नाही. सरपंच सुनेने गावात अनेक विकासकामं करून घेतली. या कुटुंबातील सरपंचाच्या सुनेने पथदिव्यांपासून ते रस्त्यावर पाण्यापर्यंतची प्राथमिक व्यवस्था केली आहे. घरातील आणखी एका मोठ्या सुनेने मागच्या वेळी सरपंचपदाची निवडणूक लढवली होती पण तेव्हा तिचा पराभव झाला होता पण आता धाकटी सून गावची सरपंच आहे.

Rajasthan Family
Healthy Lifestyle Habits: तुम्हाला, कायमचे निरोगी राहायचंय का? मग, दररोज पाळा सुदृढ आरोग्याची ‘ही’ पंचसूत्री

आता या कुटुंबाच्या घराबद्दल बोलूया. या कुटुंबात एकूण 6 घरे आहेत जी एकमेकांना जोडलेली आहेत आणि अशा प्रकारे बांधलेली आहेत की एका घरातून तुम्ही दुसऱ्या घरात जाऊ शकता. म्हणजे वरुन जरी एक घर दिसलं तर आतमध्ये सहा वेगळी घरं आहेत. या कुटुंबात एकूण ११ स्टोव्ह आहेत ज्यावर कुटुंबातील वृद्ध महिला सकाळ संध्याकाळ अन्न शिजवतात, त्यांचं काम फक्त स्वयंपाक करण्याचं असतं.

कुटुंबातील २ सदस्य शिक्षक आणि २ सदस्य कंपाउंडर आहेत, काही लोक खाजगी नोकरी देखील करतात. या सर्व लोकांसाठी एकाच वेळी सुमारे ६५ किलो पिठाच्या रोट्या बनवल्या जातात. त्यांच्या जेवणाचा खर्चही १२ लाख रुपयांपर्यंत येतो.

सर्वांना सोबत घेऊन एवढी वर्षे एकाच कुटुंबात राहणे आणि एवढे मोठे कुटुंब सांभाळणे या प्रश्नावर कुटुंबप्रमुख मोहनलाल सांगतात की, ते ६ भाऊ असून सर्व भावांची कुटुंबं एकत्र राहतात, सर्व काम करतात, मुलं आणि मुलीही अभ्यास करतात आणि घरातील कामंही शेअर करतात. आमच्या आजोबांनी आम्हाला एकत्र राहायला शिकवलं होतं, तेही एकत्र कुटुंबात राहत होते आणि आम्हीही ही परंपरा पुढे नेत आहोत.

मोहनलाल यांनी सांगितलं की, आधी आमचे एकच घर होते, ज्यात ३० खोल्या होत्या, जेव्हा कुटुंबातील सदस्य वाढले, तेव्हा हळूहळू घर आणखी बांधलं गेलं. आता या घरात एकूण ८४ खोल्या आहेत.

अजमेरचं हे कुटुंब देशातील दुसरं सर्वात मोठे कुटुंब बनलं आहे. मिझोरामच्या झिओना चना यांचं कुटुंब हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठं कुटुंब आहे. या कुटुंबातही जवळपास २०० सदस्य आहेत. त्यांच्या घरात १०० खोल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()