तुम्ही आजवर अनेक प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यांबद्दल ऐकले असेल. चोरांना दिलेल्या जगावेगळ्या शिक्षाही तुम्ही ऐकल्या असतील. पण, आता समोर आलेली गोष्ट मात्र जरा विचित्रच आहे. काही चोऱ्या लगेचच उघडकीस येतात तर काही चोऱ्या या वर्षानुवर्षे प्रकाशझोतात येत नाहीत.
काही चोरीची प्रकरणे दररोज घडत असतात. मात्र, त्यामागील खरे चोर समोर येत नाहीत. घराच्या तुलनेत दुकानांमध्ये चोरीचा धोका जास्त असतो कारण इथे ग्राहकांची प्रतिष्ठा नंतर डळमळीत होते. अशीच एक घटना सध्या लोकांमध्ये चर्चेत आहे. जिथे दागिन्यांच्या दुकानात काम करणाऱ्या महिलेने दुकानातून एक-दोनदा नव्हे तर तब्बल 47 वेळा चोरी केली.