सोशल मीडियावर आपण अनेकदा छोट्या-मोठ्या गोष्टींवरून होणाऱ्या भांडणाचे व्हिडिओ पाहतो. अनेक वेळा कारणे अशी असतात की ती पाहून तुम्हाला धक्का बसतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन महिला भांडत आहेत. हे नळावरील पाण्यासाठीचे भांडण नाही. तर, ह्योच माझा नवरा यावरून झालेलं भांडण आहे.
समस्तीपूरच्या मुफसिल आणि नगर पोलिस स्टेशनच्या आवारात असे दृश्य पाहायला मिळाले. नक्की हे प्रकरण काय आहे, त्या महिला कोणत्या कारणासाठी भांडत होत्या. अधिक जाणून घेऊयात. (Trending News)
बिहारमध्ये असे अनेक प्रकार घडतात. ज्या एखाद्या चित्रपटाच्या दृश्यापेक्षा कमी वाटत नाहीत. ज्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकतेच बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यात असे एक प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये दोन महिला परवलपूर पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्या आणि त्या दोघींनी एकच पुरुष आपला पती असल्याचा दावा केला आणि त्या पुरुषाला सोबत घेऊन जाण्यावर त्या ठाम होत्या.
हे प्रकरण बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील आहे. जिथे दोन महिला एकाच व्यक्तीला आपला नवरा म्हणताना दिसतात. दोन्ही महिला त्या व्यक्तीबाबत स्वतःचे म्हणणे मांडत आहेत. या भांडणात दोन्ही महिला पुरुषाला आपापल्या बाजूने खेचताना दिसतात. ही घटनाही शहर पोलिस ठाण्याच्या आवारात अनेक पोलिसांच्या उपस्थितीत घडली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, एक महिला तिच्या नवऱ्याची कॉलर धरून म्हणतेय - तो दुसऱ्या जातीचा असूनही मी त्याच्याशी लग्न केले आहे, तर दुसरी महिला जोरजोरात म्हणत आहे - आम्ही यादव आहोत आणि माझा नवराही यादव आहे, म्हणजे हा माझाच नवरा आहे.
माझ्या नवऱ्याला सोड, तू माझ्या नवऱ्याला हात लावू नको, अशा भाषेत या महिला एकमेकींना बोलत आहेत.
या दोन्ही महिला त्या पुरुषाला आपल्याकडे खेचतात. काही वेळातच हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. प्रकरण इतकं गुंतागुंतीचं झालं की कोण बरोबर आणि कोण चूक हेच कळत नव्हतं. पोलिसही हे प्रकरण शांतपणे हाताळत होते.
दोन्ही महिला आपापल्या दाव्यावर ठाम होत्या आणि या वादात तो माणूस शांतपणे उभा होता. जणू काही त्याला कोणी विचारतच नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे.
लोक सर्व प्रकारच्या मजेदार कमेंट करत आहेत त्यावर कमेंट्स करत आहेत. ही घटना एखाद्या चित्रपटातील दृश्यापेक्षा कमी नाही,असे नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.