Ishita Kishore Interview : ऑल राऊंडर अधिकारी कसं व्हावं? UPSC टॉप करण्यापूर्वीचा इशिताचा व्हिडिओ व्हायरल

upsc topper ishita kishore interview video goes viral ishita kishore Video UPSC Result 2022
upsc topper ishita kishore interview video goes viral ishita kishore Video UPSC Result 2022
Updated on

UPSC CSE 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. दिल्ली विद्यापिठाच्या श्रीराम कॉलेजमध्ये कॉमर्सची विद्यार्थीनी इशिता किशोरने या परीक्षेत देशात टॉप केलं आहे. यासोबतच इशिता चा मॉक इंटरव्ह्यूचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या मुलाखतीत कॉलेजियम सिस्टम, रशिया-चीन यांच्यासोबत भारताचे संबंध, खाजगीकरण, देशाच्या आर्थिक स्थितीबाबत अनेक मुद्द्यांवर इशिताने उत्तरे दिली आहेत.

या मुलाखतीत इशिता स्वतःबद्दल अनेक प्रश्नांची उत्तरे देखील देताना दिसत आहे. इशिता मुलाखतीत सांगते की ती खेळात खूप सक्रिय सहभाग घेत असे. ती शाळेतही अनेक गोष्टीत सहभागी होत असे. इशिता सांगितले की, ऑलराउंडर असण्यासोबतच नेतृत्व कौशल्य आणि टीममध्ये काम करण्याची क्षमता सर्वात महत्त्वाची आहे. UPSC ची तयारी करणाऱ्या सर्व लोकांसाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त ठरणारा आहे.

UPSC परीक्षा 2022 चा निकाल मंगळवारी, 23 मे रोजी जाहीर झाला. आयोगाने जाहीर केलेल्या यादीत मुलींनी अव्वल 3 क्रमांक पटकावले आहेत. तसेच इशितानंतर गरिमा लोहिया दुसऱ्या तर उमा हर्थी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

upsc topper ishita kishore interview video goes viral ishita kishore Video UPSC Result 2022
Naxalites : अनर्थ टळला! छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर सापडली ट्रॅक्टर भरून स्फोटकं; १० जण अटकेत

UPSC CSE 2022 मध्ये एकूण 933 उमेदवार निवडले गेले आहेत. यामध्ये 613 पुरुष आणि 320 महिला उमेदवारांचा समावेश आहे. एकूण 345 उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. 99 EWS, 263 OBC, 154 SC, आणि 72 हे ST प्रवर्गातील आहेत. याशिवाय 178 उमेदवारांना राखीव यादीत ठेवण्यात आले आहे.

upsc topper ishita kishore interview video goes viral ishita kishore Video UPSC Result 2022
Sharad Pawar : शरद पवार पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर; आता 'या' बड्या नेत्याकडे सगळ्यांच्या नजरा

UPSC CSE 2022 टॉपर इशिता किशोरने DU च्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवी प्राप्त केली आहे. तिने अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. दोन वर्षे नोकरी केल्यानंतर इशिताने यूपीएससीची तयारी सुरू केली. दुसरीकडे, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या गरिमा लोहियाने डीयूच्या करोडीमल महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. ती बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील रहिवासी आहे. ग्रॅज्युएशननंतर गरिमाने यूपीएससीची तयारी सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.