आजी कोरोनात गेली! तरूणाने AIच्या मदतीने केलं 'जिवंत'; गप्पा ऐकून डोळ्यात येतील अश्रू | Artificial Intelligence

आईवडिलांच्या घटस्फोटानंतर वू याला आजीने सांभाळलं होतं.
Grandmother and grandson
Grandmother and grandsonSakal
Updated on

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या जगात सर्व काही शक्य आहे. या तंत्रज्ञानाचा लोकं वेगवेगळ्या पद्धतीने फायदा उचलत आहेत. तर या तंत्रज्ञानाचा वापर करून एका तरूणाने आपल्या मृत आजीशी संवाद साधला आहे. या घटनेचा ऑडिओ आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.

ही घटना चीनमधील आहे. एका तरूणाने आपल्या आजीला या तंत्रज्ञानाने जणू जिवंतच केलं आहे. वू असं या तरूणाचं नाव असून तो २४ वर्षाचा आहे. व्हिडिओमध्ये तरूणाने सांगितलं की, "आजी, माझे वडील आणि मी लूनर नववर्ष साजरे करण्यासाठी गावी परत जाणार आहोत. वडिलांनी तुला शेवटचा फोन केला होता तेव्हा तू त्यांना काय म्हणाली होतीस?" त्यावर आजीने उत्तर दिले की, "मी त्यांना सांगितलं होतं की, दारू पिऊ नकोस, पैशांची बचत कर आणि पत्ते खेळू नकोस."

Grandmother and grandson
What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
Grandmother and grandson
Grandmother and grandsonSakal

आजीने उत्तर दिल्यानंतर वू म्हणतो की, "तू त्यांना हे सांगायला पाहिजे, कारण त्यांचे वय ५० वर्षे झाले तरी ते रोज दारू पितात. त्यांच्याकडे पैशांची बचत नाहीये... आजी तू लूनर नवं वर्ष साजरं करण्यासाठी काय खरेदी केलं आहे?" आजी म्हणाली, "मी खाद्य तेलाच्या दोन बाटल्या खरेदी केल्या आहेत. हे तेल शेतकऱ्यांनी तयार केलं आहे, त्याचा वास चांगला आहे, एक बाटली ७५ युआनची आहे."

Grandmother and grandson
Crime News : भररस्त्यात विवाहितेच्या विनयभंगाचा प्रयत्न; 'कारमध्ये बस' म्हणत शिवीगाळ

दरम्यान, वू च्या आजीचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले होते. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर वू याला आजीने सांभाळलं होतं. पण पुढे कोरोनाच्या काळात तिचा मृत्यू झाला असं वू याने सांगितलं आहे. त्याला आजीच्या निधनानंतर खूप दु:ख झाले त्यामुळे त्याने आजीशी संपर्क करण्यासाठी AI ची मदत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.