Mumbai Viral Video: मुंबईत तरुणींच्या 'गँग'ची दहशत! शाळकरी मुलीला तुडवून तुडवून मारलं

Mumbai Viral Video girls Thrashed: व्हिडिओमध्ये तरुण मुलींची एक टोळी एका शाळकरी मुलीला बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. कसलीही माणूसकी न दाखवता मुलीला जब्बर मारहाण करण्यात आली आहे.
VIRAL VIDEO
VIRAL VIDEO
Updated on

मुंबई- सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ मुंबईच्या वर्सोवातील यारी रोड परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये तरुण मुलींची एक टोळी एका शाळकरी मुलीला बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. कसलीही माणूसकी न दाखवता मुलीला जब्बर मारहाण करण्यात आली आहे. 'फ्री प्रेस जनरल'ने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

दीपिका नारायण भारद्वाज यांनी यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तरुणींची टोळी शाळकरी मुलीला गलिच्छ शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे. तिचे केस ओढून लाथा-बुक्क्यांनी तिला मारहाण केली जाते. मुलगी कसंतरी त्यांच्या तावडीतून सुटते आणि आपल्या मित्रांजवळ जाते. पण, तिथे येऊन देखील ही तरुणींची टोळी तिला मारहाण करते.

VIRAL VIDEO
विधानसभेच्या तोंडावर शिंदेंच्या सेनेतील वाद चव्हाट्यावर! दिंडोशीतील पदाधिकाऱ्यांच्या 'फ्री स्टाईल' हाणामारीचा Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.