Video: कुनो नॅशनल पार्कमधून आनंद वार्ता! आशा मादी चित्त्यानं दिला तीन बछड्यांना जन्म

या तिन्ही बछड्यांचा व्हिडिओ केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी शेअर केला आहे.
Video: कुनो नॅशनल पार्कमधून आनंद वार्ता! आशा मादी चित्त्यानं दिला तीन बछड्यांना जन्म
Updated on

मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधून एक आनंद वार्ता आली आहे. यामध्ये आशा या मादी चित्त्यानं तीन बछड्यांना जन्म दिला आहे. या तिन्ही बछड्यांचा व्हिडिओ केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी शेअर केला आहे. या बातमीमुळं सरकारच्या चित्ता संवर्धनाच्या मोहिमेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (Video Happy news from Kuno National Park Asha female Cheetah gave birth to three cubs)

केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केली पोस्ट

केंद्रिय मंत्री भुपेंद्र यादव यांनी या बछड्यांचा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं की, "जंगलात गुरगुरनं ऐकू आलंय! कुनो नॅशनल पार्कमध्ये तीन नवीन सदस्यांचे स्वागत झालंए, हे सांगताना आनंद होत आहे. (Latest Marathi News)

नामिबियातील मादी चित्ता आशानं या पिल्लांना जन्म दिला आहे. पर्यावरण संतुलनासाठी पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वप्न पाहिलेल्या चित्ता प्रकल्पासाठी हे एक मोठं यश आहे. प्रकल्पात सहभागी सर्व तज्ज्ञ, कुनो वन्यजीव अधिकारी आणि संपूर्ण भारतातील वन्यजीव प्रेमींचं मी खूप खूप अभिनंदन करतो" (Marathi Tajya Batmya)

Video: कुनो नॅशनल पार्कमधून आनंद वार्ता! आशा मादी चित्त्यानं दिला तीन बछड्यांना जन्म
Uddhav Thackeray : "तेव्हा फडणवीसांना सरकार पाडण्याची दिली होती धमकी"; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

'प्रोजेक्ट चित्ता' काय?

यापूर्वी मार्च २०२३ मध्ये सियाया या चित्ता मादीनं चार बछड्यांना जन्म दिला होता. यांपैकी केवळ एकच जिवंत राहू शकलं. आशा आणि सियाया या दोन्ही मादा चित्त्यांची 'प्रोजेक्ट चित्ता' अंतर्गत नामिबियातून भारतात स्थलांतर करण्यात आलं आहे. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांचं अस्तित्व पुन्हा निर्माण व्हावं यासाठी हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.