Viral Video: डॉक्टरांच्या वार्षिक परिषदेत तरुणीचा डान्स; सोशल मीडियावर चर्चेला फुटलं तोंड; पाहा व्हिडिओ

Viral Video of dance performance at doctor annual conference: ५८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक महिला डान्सर असोसिएशन ऑफ कोलन आणि रेक्टल सर्जन ऑफ इंडियाच्या वार्षिक परिषदेमध्ये उपस्थित डॉक्टरांचे मनोरंजन करताना दिसत आहे.
Viral Video of doctor dance
Viral Video of doctor dance
Updated on

चेन्नई- डॉक्टरांच्या वार्षिक परिषदेदरम्यान महिलेचा डान्स परफॉर्मन्स आयोजित करण्यात आल्यावरून चर्चेला तोंड फुटलं आहे. याप्रकरणी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ५८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक महिला डान्सर असोसिएशन ऑफ कोलन आणि रेक्टल सर्जन ऑफ इंडियाच्या वार्षिक परिषदेमध्ये उपस्थित डॉक्टरांचे मनोरंजन करताना दिसत आहे.

सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावरून चर्चांना सुरुवात झाली आहे. काहींनी अशा प्रकारच्या आयोजनाचा निषेध केला आहे, तर काहींनी या सर्व प्रकाराचे समर्थन केले आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, काही डॉक्टर हातामध्ये ड्रिंक घेऊन महिला डान्सरसोबत नाचत आहेत. एका युझरने यासंदर्भातील व्हिडिओ पोस्ट केला असून अशा प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

Viral Video of doctor dance
Viral Video: प्राण्यांच्या चरबीनंतर तिरुपती लाडूत आढळली तंबाखू, भक्ताने शेअर केला व्हिडिओ

युझरने म्हटलंय की, असोसिएशन ऑफ कोलन आणि रेक्टल सर्जन ऑफ इंडियाची ही वार्षिक परिषद आहे. चेन्नई येथे १९ सप्टेंबर ते २१ सप्टेंबरदरम्यान ही परिषद भरवण्यात आली होती. @IMAIndiaOrg कडून मला जाणून घ्यायचंय की हे काय मानवी शरीरशास्त्रासंबंधी ट्रेनिंग आहे का? वयस्कर डॉक्टर महिलेला ओढत आहेत. ही एक प्रकारची मेडिकल प्रॅक्टिस आहे का?

काहींनी परिषदेमधील नाचगाण्याच्या कार्यक्रमाचे समर्थन केले आहे. काही युझर्संनी म्हटलं की, अशा प्रकारचा डान्स आपण बॉलिवूडमध्ये पाहतच असतो. शिवाय, अनेक कार्यक्रमांमध्ये असा डान्सचा शो आयोजित केला जातो. अशा प्रकारचा डान्स आपण लाखवेळा पाहिला आहे. डॉक्टर महिलेला ओढत आहेत, असं मुळीच वाटत नाही.

Viral Video of doctor dance
Viral Video : ‘असलं’ कृत्य पाहून भडकली नवरी; लग्नाच्या स्टेजवरच नवऱ्याला मारली कानाखाली, पहा व्हिडिओ 

डान्सर महिलेच्या संमतीने हे सर्व सुरु आहे. काहीच दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये आपल्या विश्वगुरूंचे मनोरंजन करण्यासाठी काही महिला नाचवण्यात आल्या होत्या. आपल्या डॉक्टरांचे देखील मनोरंजन होऊ नये का? ते देखील आपल्यासारखे व्यक्ती आहेत, असं एका युझरने म्हटलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.