Viral Video : विमानातून कसं दिसतं ढगांची चादर ओढून झोपलेलं शहर; वैमानिकाने काढलेला व्हिडिओ व्हायरल..

बेडरेटिन सॅगडिक नावाच्या पायलटने आपल्या इन्स्टा हँडलवरून हा मूळ व्हिडिओ पोस्ट केला होता. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहून त्याला पसंती दर्शवली आहे.
Pilot Viral Video
Pilot Viral VideoeSakal
Updated on

Pilot Viral Video : विमानातून जात असताना खाली असणारं शहर कसं दिसतं याचा विचार आपल्यापैकी अनेक जण करत असतात. विमानात प्रवास केलेल्या व्यक्तींनी तर ते मनमोहक दृश्य पाहिलंही असेल. रात्रीच्या वेळी ढगांमधून विमान जाताना खाली शहर कसं दिसतं, याचा व्हिडिओ एका वैमानिकाने बनवला आहे.

तुर्कीमधील एका वैमानिकाने बनवलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सायन्स गर्ल नावाच्या एक्स (ट्विटर) हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ इस्तांबुलमधील विमानतळावर विमान लँड होतानाचा असल्याचं म्हटलं जात आहे.

बेडरेटिन सॅगडिक नावाच्या पायलटने आपल्या इन्स्टा हँडलवरून हा मूळ व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यानंतर इन्स्टाग्राम, एक्स आणि फेसबुकवर देखील हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहून त्याला पसंती दर्शवली आहे. (Viral Video)

Pilot Viral Video
NASA Cat Video : नासाने अंतराळातून पाठवला मांजराचा व्हिडिओ; मानवाला मंगळावर जाण्यासाठी होणार याची मदत

पायलट सॅगडिक हे तब्बल 16 वर्षांपासून कार्यरत आहेत. या व्हिडिओच्या सुरुवातीला रात्रीच्या वेळी विमान ढगांतून वाट काढत असताना दिसतंय. काही वेळानंतर हे विमान खालच्या दिशेने जाऊ लागतं. रात्री विमानाचं लँडिंग करताना कॉकपिटमधून कसं दृष्य दिसतं, हे या व्हिडिओतून स्पष्ट होतंय.

हा एक टाईम-लॅप्स व्हिडिओ आहे. म्हणजे मूळ व्हिडिओची लांबी खूप मोठी आहे, मात्र फास्ट-फॉरवर्ड करून हा व्हिडिओ केवळ 32 सेकंदांचा करण्यात आला आहे. अर्थात, यामुळे हा व्हिडिओ अधिक आकर्षक वाटतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.