Video: मुंबईत गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या अंगावर पडली पोत्यांची रास; कामगारांनी 'असा' वाचवला जीव

पण तिला वाचवण्यासाठी तिथल्या कामगारांनी तत्परतेनं जे काम केलंय ते पाहून तुम्ही त्यांच्या कौशल्याच कौतुक नक्कीच करालं.
Viral Video
Viral Video
Updated on

Navi Mumbai Viral Video: नवी मुंबईतील एका धान्याच्या गोडाऊनमध्ये छतापर्यंत रचण्यात आलेली पोत्यांची रास तिथल्या एका कामगार महिलेच्या अंगावर कोसळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे ही महिला या या अपघातातून बचावली आहे.

पण तिला वाचवण्यासाठी तिथल्या कामगारांनी तत्परतेनं जे काम केलंय ते पाहून तुम्ही त्यांच्या कौशल्याच कौतुक नक्कीच करालं. या दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Video sacks fell on woman working in godown in Navi Mumbai workers saved her live)

Viral Video
Rahul Gandhi: राहुल गांधींचा ED-CBIला इशारा; म्हणाले, भाजप सरकार बदलेलं तेव्हा, मी गॅरंटी देतो...

नेमकं काय घडलंय?

व्हायरल व्हिडिओत दिसतंय की, एक महिला गोडाऊनमध्ये आपल्या हातातील झाडूनं स्वच्छता करताना दिसत आहे. ती अशा ठिकाणी उभी आहे की तिच्या सर्व बाजूंनी अगदी हातभराच्या अंतरावर छतापर्यंत धान्याची पोती रचून ठेवण्यात आली आहे. खरंतर तो गँगवे आहे जी येण्याजाण्याची चिंचोळी जागा आहे. (Latest Marathi News)

ती हातातील झाडू घेऊन काम करत असतानाच अचानक बाजूची पोत्यांची राम तिच्या अंगावर कोसळली, यामुळं घाबरलेल्या महिला मोठ्यानं ओरडली. त्याचवेळी तिथं काम करत असलेले आठ ते दहा पोती उचलणारे कामगार एकामागून एक स्वतः हून पोती हटवण्याच्या कामाला लागले. त्यांनी विशिष्ट पद्धतीनं महिलेच्या अंगावर पडलेली पोती हटवण्यासाठी मोहिम राबवली.

Viral Video
WPL 2024 MIW Vs RCBW : एलिस पेरी एकटी भिडली, मात्र मुंबईने आरसीबीच्या मुसक्या आवळल्या

पाहता पाहता त्यांनी ही पोती क्षणात दूर केली आणि त्याखाली अडकलेल्या महिलेचा जीव वाचवला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरलं झालं आहे. ज्या व्यक्तीनं हा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यानं या घटनेची दखल पोलिसांनी घ्यावी यासाठी तो मुंबई पोलीस आणि नवी मुंबई पोलिसांना टॅग केला आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.