Viral Fact : तुपामध्ये बर्फ फिरवल्याने खरंच बटर तयार होते का? Viral Video चं सत्य?

बटरमध्येही मोठ्या प्रमाणात भेसळ झालेली असते. त्यामुळे ही ट्रिक वापरून तुम्ही घरच्या-घरी बटर बनवू शकता.
Viral Video
Viral Videoesakal
Updated on

Viral Fact :

सोशल मिडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. इंस्टाग्राम फेसबुकवरती काही रेसिपीचे व्हिडिओही दिसत असतात. त्यामध्ये एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो. त्या व्हिडिओवरती काही लोकांनी हे खरंच घडतंय का याची कृती सुद्धा करून बघितली आहे. आणि हे खरंच असं होऊ शकतंय का याचेही व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

काही दिवसांपासून तूपामध्ये बर्फ फिरवून बटर तयार होतं असा व्हिडिओ शेअर केले जात होते. ही रेसिपी अनेकांना बुचकळ्यात टाकणारी होती. खरंच असं होऊ शकतं का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला असेल. जाणून घेऊयात.

Viral Video
Butter Milk Benefits: उन्हाळ्यात ताक प्यायल्याने पोटाचे विकार होतात दूर

काय आहे बटरची रेसिपी

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत एका भांड्यात तूप घेतलं जातं. त्यानंतर त्यात बर्फाचे काही खडे टाकले जातात. तो बर्फ तूपामध्ये गोल-गोल फिरवले जातात. बर्फाचे खडे जसे फिरतात तसे तूपापासून घट्ट बटर तयार होतं. यातून अधिकच पाणी काढून टाकलं जातं. आणि आपलं होममेड बटर तयार होतं.

Viral Video
Peanut butter vs almond butter: पीनट बटर की आल्मन्ड बटर, कोणतं बटर आरोग्यासाठी जास्त फायदेशीर

खरंच बटर तयार होतं का?

अशा प्रकारे बटर तयार होतं का हे काही रिलस्टार्सनी बनवून पाहिलं आहे. त्याची कृती फॉलो करून जेव्हा त्यांनी खरंच असं घडतं का हे पाहिलं तेव्हा हे बटर तयार झालं. पहा त्याचा व्हिडिओ.      

बऱ्याच वेळा, ब्रँड्स पोषणाच्या नावाखाली भेसळयुक्त पदार्थ विकले जातात. बटरमध्येही मोठ्या प्रमाणात भेसळ झालेली असते. त्यामुळे ही ट्रिक वापरून तुम्ही घरच्या-घरी बटर बनवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.