सोशल मीडियावरती दररोज अनेक किचन हॅक्स व्हायरल होत असतात. स्वयंपाक घरातील अनेक गोष्टी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे यातून सांगितलेलं असतं. यात किचन सिंक स्वच्छ करणे, तुपापासून बटर बनवणे, मसाल्यांची साठवणूक करणे , कांदा लसूण सोलण्याच्या टिप्स दिलेल्या असतात.
लसूण सोलण्याचा कंटाळा प्रत्येकीला असतो. एक वेळखाऊ काम आहे असं वाटतं. त्यामुळे फार कोणी लसूण सोलण्याचं काम आपल्याकडे घेत नाही. तर काही वेळा आपण सालीसकट लसूण मिक्सरला बारीक करून घेतो. पण फोडणीला लसूण पाहिजे असतो तेव्हा तो सोलूनच घेतला जातो.
सध्या सोशल मीडिया वरती लसूण सोलण्याची एक निंजा टेक्निक वायरल होत आहे. जर तुम्हाला सोप्या आणि जलद पद्धतीने लसूण सोलायचा असेल तर ही टेक्निक तुमच्या कामी येईल.
व्हिडिओत एक मोठा लसूण अगदी चुटकीसरशी एक तरुणी सोलते. त्यासाठी ती लसूण सुट्टा करून घेत नाही तर अखंड लसूण घेऊन त्यातील देठ काढते. हा लसूण सोलण्यासाठी ती चिमट्याची मदत घेते. आणि एक एक करून सर्व लसणाच्या पाकळ्या सोलते. हे पाहताना खूपच इंटरेस्टिंग आणि भारी वाटत असलं तरी हे करणं थोडसं अवघड आहे.
व्हायरल होणारा हा व्हिडिओ ५४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्यावर अनेक लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. काही भारतीय लोकांचे म्हणणे आहे की, ही ट्रिक भारतीय जातीच्या लसणावर होणार नाही. कारण, इथला लसूण वेगळा आहे. तर काहींनी ही ट्रिक उपयोगी पडणार असल्याचे म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.