लग्नासाठी Software Engineer Ban? 'कृपया कॉल करू नका...' matrimonial Siteची ती ad चर्चेत

Software Engineersवर भाष्य करणारी ही पोस्ट सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतेय.
Viral Matrimonial Ad
Viral Matrimonial Adesakal
Updated on

अलीकडे अनेक वैवाहिक जाहिराती सोशल मीडियावर व्हायरल होत असातात. कधी वर वधूंच्या हास्यास्पद मागण्यांमुळे तर कधी मूर्खपणाच्या मागण्यांमुळे या वैवाहिक जाहिराती व्हायरल होत असतात. अलीकडेच एका matrimonial Siteच्या जाहिरातीचा एक फोटो भन्नाट व्हायरल होतोय. इंजिनीयर्सच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करणारी खरं तर ही पोस्ट आहे. मात्र ही व्हायरल पोस्ट जो ही वाचेल त्याला आधी हसू यावं अशी ही पोस्ट आहे.

साधारणत: वर वधूंसाठीच्या जाहिरांतींमध्ये धर्म, जात, शैक्षणिक पात्रता या गोष्टींबाबत माहिती देण्यात येते. मात्र या जाहिरातीतला वेगळेपणा म्हणजे या जाहिरातीच्या शेवटी 'कृपया सॉफ्टवेअर इंजिनीयर्स कॉल करू नका' असे लिहीले होते. एकीकडे ही पोस्ट सॉफ्टवेअर इंजिनीअरच्या भविष्यावर टांगती तलवार असल्याचे भाष्य करते तर दुसरीकडे ज्या कुटुंबाने या मॅट्रिमोनीअल साईटमार्फत ही जाहिरात दिली होती त्यांना सॉफ्टवेअर इंजिनीअरचा राग असावा असे दर्शवते.

Viral Matrimonial Ad
Viral: शाब्बास! शारीरिक सुख नाही तर शांततेच्या शोधात पठ्ठयाने ४३ वर्षात केले ५३ लग्न

काय होती ती जाहिरात?

"वर पाहिजे, हिंदू पिल्लई NV 24/155 गोरी MBA, श्रीमंत कौटुंबिक व्यवसाय असणारी सुंदर मुलगी IAS/IPS, कार्यरत डॉक्टर (PG), एकाच जातीतील उद्योगपती/व्यापारी माणूस”. वरात आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेच्या वर्णनाव्यतिरिक्त, शेवटी एक विभाग होता ज्यामध्ये असे म्हटले होते, (सॉफ्टवेअर अभियंते कृपया कॉल करू नका)”

Viral Matrimonial Ad
Viral Video : 'सामी सामी...' गाण्याची क्रेझ, चिमुकल्यांनाही लागलंय वेड

ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होतेय. इंजिनीअर मुलगा वर म्हणून का नको? विशेष म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनीअर याबाबतचा संभ्रम कायम ठेवणारी ही पोस्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.