Viral News : धक्कादायक! भांडणानंतर मुलीने गिळला चक्क मोबाईल

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिण भावाच्या भांडणामध्ये रागाच्या भरात बहिणीने चक्क मोबाईल गिळलाय.
Viral News
Viral Newssakal
Updated on

Viral News : छोट्या मोठ्या कारणावरुन अनेकदा वाद किंवा भांडण झाल्याचे अनेक प्रकरणे तुम्ही वाचले असावेत पण सध्या एक आगळं वेगळं प्रकरण चर्चेत आलंय. एका मुलीने भांडणानंतर चक्क मोबाईल गिळलाय. तुम्ही म्हणाल, हे कसं शक्य आहे? पण हे खरंय.

मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिण भावाच्या भांडणामध्ये रागाच्या भरात बहिणीने चक्क मोबाईल गिळलाय. (Viral News a girl swallows mobile phone after fighting with brother )

घरं म्हटलं बहिण भावांचा छोटी मोठी भांडणे होत असतात पण मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात राहणाऱ्या या मुलीने भावासोबत भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात चक्क मोबाईल गिळला. मोबाईल गिळल्यानंतर काही क्षणातच तिला पोटात दुखायला लागले आणि कुटूंबाने तिला रुग्णालयात हलवलं. त्यावर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि फोन बाहेर काढण्यात आला.

ही तरुण अठरा वर्षाची आहे. भावासोबत झालेल्या भांडणामुळे तिला राग अनावर झाला आणि तिने चक्क चायनीज मोबाईल गिळला. तिच्यावर जवळपास दोन शस्त्रक्रिया करण्यात आली आणि ऑपरेशन यशस्वी झाले. मुलीला शस्त्रक्रिया करताना जवळपास दहा टाके पडले.

Viral News
Viral Video : ये जो सुरुर है अभी भी शशी थरुर का गुरुर है! वय वर्ष ६७ पण अजूनही…

मुलीची तब्येत स्थिर असून लवकरच तिला डिस्चार्ज दिला जाणार. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. लहान मुलांच्या हाती मोबाईल देताना काळजी घेण्याचे आवाहन नेटकरी करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()