सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या एका प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. एका नऊ वर्षाच्या मुलीवर मगरीने हल्ला केल्याची घटना समोर आली. मुलीच्या भावाला दिसताच त्याने असं काही केलं की सर्वच आश्चर्यचकीत झाले. (Viral News brother fought with crocodile to save sisters life)
नामीबियाच्या कवांगो येथे राहणारी नऊ वर्षाची मुलीवर मगरने हल्ला केला. त्यानंतर तिने खूप आरडा ओरड सुरू केली अशात तिचा भाऊच तिच्यासाठी देवदूत बनून आला आणि तिचे प्राण वाचविले. या हल्ल्यात ती खूप जखमी झाली होती.
9 वर्षाच्या रेजिमिया हाइकेरा गार्डनमध्ये झाडांना पानी देत होती. गार्डन एका नदी किनारी स्थित आहे. येथे नेहमी जलप्राणी येत असतात. अचानक तिथे मगर आली आणि मगरने रेजिमियाच्या पायाला आपल्या तोंडात घेतलं. या क्षणी रेजिमिया ओरडायला लागली. तेव्हा 19 वर्षाचा भाऊ जोहान्स तिथे पोहचला आणि त्याने बहिणीला वाचविले.
जोहान्सने मीडियाशी बोलताना सांगितले की बहिणीला ओरडताना पाहून त्याने नदीत उडी मारली. मगरच्या जबड्याला हाताने पकडले आणि बहिणीचा पाय मगरीच्या तोंडातून बाहेर काढला.
सोशल मीडियावर त्याच्या धाडसाचे कौतुक केल्या जात असून असा भाऊ प्रत्येकाला मिळावा, अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.