Viral News : लग्नाला कोणी पोरगीच देईना? पठ्ठ्याने उंची वाढवण्यासाठी खर्च केले 66 लाख

अमेरिकेतील डिनझेल सिनगर्स या व्यक्तीने त्याला मुली रिजेक्ट करायच्या म्हणून असं काही केलं की सगळेच थक्क झाले
Viral News
Viral Newsesakal
Updated on

Viral News : हल्ली लोक त्यांच्या लूक आणि लाइफस्टाइलवर बरेच पैसे खर्च करतात. परफेक्ट लूक, हेअरस्टाइलमध्ये बरेच पैसेही लोक घालवतात. अमेरिकेतील डिनझेल सिनगर्स या व्यक्तीने त्याला मुली रिजेक्ट करायच्या म्हणून असं काही केलं की सगळेच थक्क झाले.

डिनझेल सिनगर्स हा मूळचा अमेरिकेचा. त्याची उंची कमी असल्यामुळे मुलींकडून लग्नासाठी त्याला वारंवार नकार येत होते. मात्र त्याने ही समस्याच मुळातून मिटवण्याचा निर्णय घेतला. 27 वर्षाच्या डिनझेलने लेग लेंग्थनिंग ट्रिटमेंट करून घेतली. यासाठी त्याने जवळपास 81000 (66 Lakh) डॉलर खर्च केले. ट्रिटमेंट करण्याआधी त्याची उंची 5.5 फूट होती. ट्रिटमेंटनंतर त्याची उंची 6 फूट झाली.

Viral News
Viral News

न्यू यॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, नेव्हीमध्ये काम केलेले सिनगर्स म्हणतात, 'माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात माझ्या कमी उंचीमुळे मला बऱ्याच गोष्टी ऐकाव्या लागल्या. मी न्यूनगंड न बाळगण्याचा बऱ्याचदा प्रयत्न केला पण काहीवेळी मला वाईट वाटायचे. मात्र आता माझी उंची वाढल्याने मला जीवनाकडे वेगळ्या दृष्टीकोणातून बघण्याची संधी मिळाली आहे.'

पुढे ते म्हणाले की सुरुवातीला माझ्या क्रशने मला नाकारले कारण माझे वय आणि उंची दोन्ही कमी होती. पण 'मी आता मुलींपुढे जाण्याआधी माझ्या उंचीचा विचार करू लागलो, तेव्हापर्यंत मी अनेक चांगल्या संधी गमावल्यात.' (Viral News)

अहवालानुसार, सिनगर्सने यावर अनेक वर्षे यावर संशोधन केले. त्याला योग्य मार्ग सापडला आणि त्याचे संशोधन यशस्वी ठरले. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने आपले पाय दाखवले आहेत. यासोबतच त्याने त्याचे फोटोही शेअर केले आहेत.

Viral News
Viral News : हेच काय ते कलयुग? कॉलेजला हवाय विद्यार्थ्यांच्या सॅलरीत हिस्सा! सोशल मीडियावर होतेय चर्चा

सिनगर्सच्या पोस्टवर लोक भरभरून कमेंट करून त्यांचे अभिनंदन करत आहेत. त्याच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाने त्याने अनेकांना चकित केले आहे. आणि बरेच लोक आता त्याला या ट्रिटमेंटबाबत विचारत आहेत. एक यूजरने कमेंटमध्ये म्हटले की, 'तुला चांगली बायको मिळेल'. तर दुसर्‍या यूजरने सांगितले की, 'ट्रिटमेंटनंतर बरे होण्यास किती वेळ लागतो?' डिनझेलच्या लेग लेंग्थनिंग ट्रिटमेंटबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. (America)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.