लग्नाचे अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक थकीत करणारं प्रकरण उत्तर प्रदेशमध्ये घडलंय. उत्तर प्रदेशच्या सम्भल येथे एका लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्याला नवरदेवाने नवरीला तीनशे पाहूण्यांसमोर किस केलं त्यामुळे संतापलेल्या नवरीने चक्क नवरदेवाची पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि अशा व्यक्तीसोबत तिला राहायचं नाही, अशी ती म्हणते. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलंचं चर्चेत आलंय.
हे जोडपे 26 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेश सामुहीक विवाह योजनामध्ये सहभागी होत लग्नबंधनात अडकले होते. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या Reception Ceremony ला नवरदेव-नवरी स्टेजवर बसले होते. अचानक नवरदेवाने नवरीला उपस्थित असलेल्या 300 पाहूण्यांसमोर किस केले.
नवरदेवाचं हे कृत्य नवरीला आवडले नाही. त्यामुळे ती रागात स्टेजवरुन निघून गेली. तिच्या घरच्यांनी तिला समजून सांगण्याचा पुरेपुर प्रयत्न केला पण तिने पोलिस स्टेशनमध्ये जाण्याचा हट्ट धरला. तिने पुन्हा स्टेजवर जाण्यास नकार दिला आणि थेट नवरदेवाची तक्रार दाखल करण्यासाठी थेट पोलिस स्टेशन गाठले.
पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत ती म्हणाली, मला आता या व्यक्तीसोबत राहायचे नाही. मी माझ्या घरी राहणार. मला त्याचं वागणं आवडलं नाही. जो व्यक्ती 300 लोकांसमोर असं कृत्य करतो, तो कसा सुधारणार. त्यामुळे याच्या विरोधात कारवाई करणे गरजेचं आहे.
नवरदेवाने नवरीने केलेले आरोप फेटाळून लावले. नवरदेव म्हणाला, स्टेज वर किस करणे हा पैज लावण्याचा भाग होता. मी नवरीसोबत पैज लावली होती. जर मी नवरीला सर्वांसमोर स्टेजवर किस केले तर ती मला 1500 रुपये देणार होती. जर मी असं करू शकलो नसतो तर मला नवरीला 3000 रुपये द्यावे लागले असते.
जेव्हा पोलिसांनी या पैज विषयी नवरीला विचारले तेव्हा तिने अशी कोणतीही पैज लावली नसल्याचं सांगितलं.
खूप वाद आणि चर्चेनंतर दोघांनी एकत्र न राहण्याचा निर्णय घेतलाय. सध्या या प्रकरणाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.